अबब! बॉलिवूड तारकेचा केवढा हा महागडा गाऊन

चमचमत्या सौदर्यस्पर्धेत तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

नुकतीच ५४वी ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१७’ सौंदर्यस्पर्धा पार पडली. मुंबईतील ‘यश राज’ स्टुडिओत रविवारी भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत अर्जुन रामपाल, मनिष मल्होत्रा, अभिषेक कपूर, बिपाशा बासू, विद्युत जामवाल आणि इलियाना डिक्रुझ यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. करण जोहर आणि रितेश देशमुखचे सुत्रसंचालन असलेल्या या स्पर्धेत अनेक तारे-तारकांसोबत विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. अलिया भट, सुशांत सिंग राजपूत, सोनू निगम आणि रणबिर कपूरने आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्घ केले. असं असल तरी, या चमचमत्या सौदर्यस्पर्धेत बिपाशा बासूवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केलेली बिपाशा उपस्थितांच्या आकर्षणाचा विषय ठरली होती.

हरियाणाच्या मनुशी चिल्लरने ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१७’ किताब जिंकला. मनुशीनंतर मार्क बुमगार्नरचा ‘स्ट्रॅपलेस’ गाऊन परिधान केलेल्या बिपाशा बासूची समाज माध्यमांवर सर्वाधिक चर्चा होती. ‘मिकाडो’ सिल्कमधून साकारण्यात आलेला बिपाशाचा हा इव्हिनिंग गाऊन मार्कच्या लेटेस्ट २०१७ च्या कलेक्शनमधला आहे. डिझाईन आणि कापडाचा दर्जा हे या आकर्षक गाऊनचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा गाऊन अधिकच खास ठरतो.

बिपाशाने गाऊनला साजेसा मेकअप आणि केशरचना साकारली होती. हलक्या गुलाबी रंगाची ग्लॉसी लिपस्टिक, स्मोकी आइज आणि हाफ टाइड हेअरमधील बिपाशा खचितच सुंदर दिसत होती. सोनेरी आणि चंदेरी मिलाफ असलेली कानातील अभूषण तिचे सौंदर्य अधिकच खुलवत होती.

सौंदर्यवतींची स्पर्धा म्हटल्यावर सर्व गोष्टी या उंचीच असणार हे ओघाने आलेच. परंतु बिपाशाने परिधान केलेल्या गाऊनची किंमत ऐकून उपस्थितांनी आश्चर्याने बोटे तोंडात घातली. या आकर्षक गाऊनची किंमत तब्बल तीन लाखांच्या वर आहे. तुम्हालासुध्दा बसलाना धक्का!

विविध बातम्या जलदगतीने जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून https://www.facebook.com/LoksattaLive/ लोकसत्ताच्या फेसबुक पेजला आजचं लाईक करा.

(Photo: Varinder Chawla)
(Photo: Varinder Chawla)
(Photo: Varinder Chawla)
(Photo: Varinder Chawla)
(Photo: Twitter/@feminamissindia)
(Photo: Twitter/@feminamissindia)

Green and Gold #loveyourself

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

And this is the way we roll… in the make up room Thank you @pinka25 for this video

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bipasha basu gown cost miss india 2017 contest can give you a mini heartattack

ताज्या बातम्या