चित्रविचित्र कपडे घालून फिरणारी उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात गेल्या कित्येक दिवसापासून वाद सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा वाद सुरू झाला. उर्फीच्या विरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. चित्रा वाघ यांना उर्फीने सोशल मीडियाद्वारे उत्तरं दिली होती. त्यांच्यातील शा‍ब्दिक वाद सुरू असताना आता चित्रा वाघ यांनी पुन्हा या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

चित्रा वाघ यांनी नुकतंच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, “कुणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण काय घालायचं काय नाही, हे ठरवण्यासाठी आधी कपडे घातले पाहिजेत. उर्फीसारखी निर्लज्ज बाई मी आजपर्यंत बघितली नाही. माझ्या शरीराचा ‘हा’ भाग दिसला, तरंच माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असं ती म्हणाली. मला हे बोलताही येत नाहीये”.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

हेही वाचा>> “देवेंद्रजी, बायकोला मराठी बोलायला…”, मकर संक्रांतीच्या शुभेच्छांवरून अमृता फडणवीस ट्रोल

उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याप्रकरणी आणि पोलिसांनी तिला नोटीस पाठवल्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. “मी काही कायद्याची विद्यार्थिनी किंवा वकील नाही. पण मला माहीत आहे, या प्रकरणात काय होऊ शकतं. उर्फीला तुरुंगात टाकण्याचा माझा उद्देश नाही. तू कुठेही जा पण व्यवस्थित कपडे घालून जा, एवढंच माझं म्हणणं आहे. याबाबत कायद्यात काय तरतूद आहे, हे मला माहीत नाही. पण महाराष्ट्राच्या रस्त्यांवर असा नंगानाच केला, तर जाब विचारणारे आम्ही आहोत”, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी मांडली.

हेही वाचा>> “…आणि मी श्रेयसला मिठी मारुन रडायला लागले”, प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ प्रसंग

नेमका वाद काय?

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. “उर्फीला थोबडवेन”, असं विधानही त्यांनी केलं होतं. त्यानंतर उर्फीने “नंगानाच सुरुच राहणार” असं म्हणत त्यांना प्रत्युतर दिलं होतं. उर्फी व चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युदध सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली. त्यानंतर उर्फीने शनिवारी (१४ जानेवारीला) तिचा जबाब नोंदवला आहे.