scorecardresearch

“एक एक आमदार की कीमत तुम क्या जानो…” सुबोध भावेंच्या प्रश्नांना पंकजा मुंडेंचे फिल्मी स्टाईल उत्तर

त्यावेळी पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

“एक एक आमदार की कीमत तुम क्या जानो…” सुबोध भावेंच्या प्रश्नांना पंकजा मुंडेंचे फिल्मी स्टाईल उत्तर
पंकजा मुंडे सुबोध भावे

‘झी मराठी’च्या (zee marathi) ‘बस बाई बस’(bus bai bus) या कार्यक्रम सध्या चांगलाच रंगतदार होताना दिसत आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर या सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे चार भाग प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता लवकरच या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) सहभागी होणार आहेत. नुकतंच बस बाई बस कार्यक्रमाचा प्रोमो झी मराठीने शेअर केला आहे. यात विविध गंमतीजमती पाहायला मिळत आहे.

झी मराठीने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवर आगामी भागातील एक प्रोमो शेअर केला आहे. यात सुबोध भावे हे पंकजा मुंडे यांच्याशी बोलताना दिसत आहे. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. नुकतंच त्यांनी यावर भाष्य केले.

या कार्यक्रमात पंकजा मुंडेंना सुबोध भावेने राजकीय स्थितीबद्दल एक प्रश्न विचारला. दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? असा प्रश्न सुबोध भावेंनी विचारला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी फ्लिमी स्टाईलमध्ये उत्तर दिलं. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पंकजा मुंडेंच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली. तर सुबोध भावे यांनी वाहवा असे म्हटले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader pankaja munde bus bai bus talk about other party mla with subodh bhave nrp