दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ खूप चर्चेत असतात. अनेकदा मेट्रोत भांडणं व हाणामारी झाल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता अभिनेत्री बॉबी डार्लिंगचा दिल्ली मेट्रोतील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका तरुणाला मारताना दिसत आहे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री बॉबी डार्लिंग या व्हिडीओमध्ये दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीशी भांडताना दिसत आहे. एवढेच नाही तर दोघांमध्ये जोरदार भांडण आणि शिवीगाळ होते.

“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”

Digital Health Incentive Scheme
यूपीएससी सूत्र : स्मार्ट सिटी मिशनची मुदतवाढ अन् ‘डिजिटल हेल्थ इन्सेटिव्ह स्कीम’, वाचा सविस्तर…
Viral video a woman standing at the door of a moving train made a reel
Viral Video: रील्सच्या नादात काय काय करतात! धावत्या लोकलच्या दरवाजात तरुणीचा डान्स; थोडीशी चूक अन् खेळ खल्लास
Horrific VIDEO: Miscreants Drag Youth By Collar Alongside Moving Train At Bhopal Railway Station
प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशाची चालत्या ट्रेनमधून कॉलर पकडली; फरफटत नेलं अन्…रेल्वे स्टेशनवरचा थरारक VIDEO व्हायरल
Train Couple Intimate
हा तर निर्लज्जपणाचा कळस! धावत्या ट्रेनमध्ये कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की..; VIDEO व्हायरल
guwahati railway station shopkeeper sells snacks more than mrp action taken
“अरे जा ना बाबा तिकडे”, रेल्वेस्थानकावर विक्रेत्याची मनमानी; प्रवाशाला दिल्या धमक्या; VIDEO व्हायरल
helmet clad chain snatcher targets unsuspecting woman eating pizza with friend in haryanaa panipat shocking video viral
तो आला, त्याने पाहिले अन् सोन्याची चेन चोरून झाला पसार; हॉटेलमध्ये प्रथमच झाली अशी चोरी; घटनेचा VIDEO व्हायरल
lok sabha election result 2024 axis my india ceo pradeep gupta breaks down into tears during live tv show exit poll 2024
निवडणुकीचे निकाल पाहून भरलाईव्ह कार्यक्रमात फोडला हंबरडा; एक्झिट पोलच्या आकडेवारी काढणाऱ्या अधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल
raveena tondon attacked
“तुम्ही मला असं ढकलू शकत नाही”, रवीना टंडनची भररस्त्यात बाचाबाची; कार पार्किंगवरून वाद, प्रकरण थेट पोलिसांत!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती पुरुष प्रवाशाशी गैरवर्तन करताना दिसत आहे. दोघांचं भांडण वाढल्यानंतर एक सीआयएसएफ हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. व्हिडीओमध्ये बॉबी डार्लिंगच्या हातात एक पांढरी बॅग असल्याचे दिसत आहे. तो प्रवाशी ती बॅग ओढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दोघांचे जोरदार भांडण होते. या भांडणात अभिनेत्री पुरुष प्रवाशाला शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना दिसत आहे. तो प्रवाशी तिला दुसरीकडे बसायला सांगतो पण ती शिवीगाळ करतच राहते. त्यानंतर सीआयएसएफ जवान मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतो.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी मेट्रोमध्ये प्रवास करणं अवघड झालं आहे, असं म्हटलं आहे. तर काहींनी दिल्ली मेट्रो मनोरंजनाचं साधन झालं आहे, अशा कमेंट्स केल्या आहेत.