अभिनेत्री काजोल बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. काजोल आता फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती खूपच सक्रिय असते. चाहत्यांबरोबर ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी शेअर करताना दिसते. अनेकद तिला आणि तिच्या लेकीला ट्रोल केलं जातं. नुकतीच ती ‘भोला’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होती.

काजोलचा पती अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटातला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते त्या स्क्रीनिंला काजोल अजसह त्यांचा मुलगा युगदेखील उपस्थित होता. स्क्रीनिंला येताना तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. तिने बॉडी कॉन ड्रेस घातला होता तसेच सनग्लासेसदेखील होते.

“या गुंड लोकांचा…” बॉलिवूडच्या कंपूशाहीवर भाष्य करणाऱ्या प्रियांका चोप्राचं शेखर सुमन यांनी केलं समर्थन

काजोलचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहले आहे, “तिला कोणीतरी ड्रेस कसा घालायचा हे सांगा”, तर दुसऱ्याने लिहले आहे, “ही गरोदर आहे का?” तर आणखीन एकाने लिहले आहे, “या अभिनेत्रीला खरंच मेकओव्हर करण्याची गरज आहे.” अशा प्रतिक्रिया येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याबरोबरच हा चित्रपट ३डी मध्येसुद्धा उपलब्ध आहे.