देशभरात सध्या Uniform Civil Code अर्थात समान नागरी कायद्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या कायद्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम असे गट पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काही गटांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते, साहित्य जगत, कलाक्षेत्र, राजकीय क्षेत्रातील काही नेतेमंडळी या सर्वांकडून भारताच्या मूलभूत विविधतेतील एकतेच्या तत्वाचा जोरकसपणे पुरस्कार केला जात आहे. अभिनेते आशुतोष राणा यांची गणना सामाजिक मुद्द्यांविषयी सतर्क व परखडपणे भूमिका मांडणाऱ्या कलाकारांमध्ये केली जाते. नुकताच अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी त्यांचा शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आशुतोश राणा यांनी नुकतंच मणिपूरमधील घटनेबाबत परखड भाष्य करणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये “इतिहास साक्ष आहे. जेव्हा समाजविघातक प्रवृत्तींनी महिलेचं अपहरण किंवा तिच्या अब्रूवर हात घातला आहे, तेव्हा त्याची किंमत संपूर्ण मानवजातीला चुकवावी लागली आहे”, अशा शब्दांत राणा यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला होता. त्यांचं हे ट्वीट व्हायरल झालं होतं. आता अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी धर्मांध लोकांना खडे बोल सुनावणारा आशुतोष राणा यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ आजतक वाहिनीच्या एका कार्यक्रमातला असून त्यात वाहिनीच्या अँकरनं आशुतोष राणा यांना “कलाक्षेत्र देशात सध्या काय घडतंय हे समजू शकतंय का?” असा प्रश्न केला. त्यावर आशुतोष राणा यांनी एका कवितेच्या माध्यमातून परखड सवाल उपस्थित केले.

बाँट दिया इस धरती को
चांद सितारो का क्या होगा
नदीयों के कुछ नाम रखे
बेहेती धारों का क्या होगा
शिव की गंगा भी पानी है
आब ए जमजम भी पानी है
मुल्ला भी पिये, पंडित भी पिये
पानी का मजहब क्या होगा
इन फिरका परस्तों से पूछें
क्या सूरज नया बनाओगे
एक हवा में साँस है सबकी
क्या हवा भी नई चलाओगे
नस्लों का करें जो बटवारा
रेहबर वो कौम का ढोंगी है
क्या खुदा ने मंदिर तोडा था
या राम ने मस्जिद तोडी है…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा शब्दांत कवितेच्या माध्यमातून आशुतोष राणा यांनी सध्याच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.