बॉलिवूड आणि पार्टी हे समीकरण गेल्या अनेकवर्षांपासून आहे. बॉलिवूड पार्ट्यांमध्ये येणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींची कायमच चर्चेत असतात. सध्या अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

हे दोघे नुकतेच मुंबईत एकत्र दिसले, दोघांनी आपले चेहरे झाकत पार्टीतून बाहेर पडले. या पार्टीचं निमित्त होतं करीना कपूरची मैत्रीण अमृता अरोराच्या वाढदिवसाची पार्टी, करिनाने आपल्या नवीन घरात या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, रितेश सिधवानी आदी लोकांनी पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र लक्ष वेधलं ते फरहान आणि अमृताचा कृतीमुळे, चेहरा लपवल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

“मी नवीन कलाकारांचा वापर करतो कारण…” चित्रपटांमधील कास्टिंगवर अनुराग कश्यपचं मोठं वक्तव्य

दोघांचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहले आहे “असं काम करता ज्यामुळे तोंड लपवयाची वेळ आली?” तर दुसऱ्याने अमृतावर निशाणा साधला आहे, त्याने लिहले आहे असही “अमृताचा फोटो कोण काढणार?” तर आणखीन एकाने लिहले आहे, “दोघे बहुदा जास्त दारू प्यायले असावेत नशेत असतील,” अशी टीका लोकांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता अरोरा गेली अनेकवर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. नुकतीच ती आपल्या बहिणीच्या ‘मूव्हिंग विथ मलायका’ या कार्यक्रमात येऊन गेली होती. तर फरहान अख्तर एका नव्या चित्रपटावर काम करत आहे.