John Abraham On Not Having Kids : जॉन अब्राहम हा बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या जबरदस्त फिटनेस आणि दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.
जॉनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अभिनेता प्रिया रुंचालशी विवाहबद्ध आहे. या जोडप्याच्या लग्नाला १३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्यांनी अद्याप मुले जन्माला घालण्याचा विचार केलेला नाही. एका जुन्या मुलाखतीत जॉनने सांगितले होते की, त्याने मुले जन्माला घालण्याचा विचार का केला नाही.
लग्नाच्या १३ वर्षांनंतरही जॉन आणि प्रियाला मूल का नाही?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका जुन्या मुलाखतीत जॉन फॅमिली प्लॅनिंग न करण्याबद्दल बोलला होता आणि त्याने म्हटले होते की, त्याचे संपूर्ण लक्ष सध्या कामावर आहे. तो म्हणाला, “सध्या, मी फक्त माझ्या कामाच्या ठिकाणी माझी व्यवस्था योग्यरित्या सेट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.” अभिनेता पुढे म्हणाला, “माझ्याकडे नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा एक फुटबॉल संघ आहे, त्यामुळे माझ्या मनात फक्त हीच गोष्ट आहे आणि माझे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे, मी अभिनेता म्हणून चित्रपटदेखील करत आहे. सध्या माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या खूप वेळ घेत आहेत.”
तो पुढे म्हणाला, “एकदा का आसपास असलेली व्यवस्था नीट झाली तरच तुम्ही इतर गोष्टींचा विचार करू शकता, सध्या तरी आम्ही आई-बाबा न होण्याचा निर्णय घेतलाय असं जॉन म्हणाला.” जॉन असेही म्हणाला, “हा परस्पर निर्णय आहे आणि आम्ही तयार केलेल्या जीवनावर आम्ही आनंदी आहोत. प्रत्येक जोडप्याचा प्रवास अद्वितीय असतो, याची ही एक मूलभूत आठवण आहे.”
तारा शर्माच्या पालकत्वाच्या टॉक शोमध्ये झालेल्या संभाषणात, जॉनने मुलांबद्दलचे आपले मतदेखील मांडले होते. अभिनेता म्हणाला होता, “तुम्ही भविष्याची योजना करू शकत नाही. जेव्हा तुम्ही जबाबदार असाल तेव्हाच तुम्ही आई-बाबा होण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा मूल जन्माला घालण्याचा विचार करू नका, जर तुम्हाला पालक होण्याचा आनंद घ्यायचा असेल आणि खूप प्रेम आणि काळजी घेऊन मुलांचे संगोपन करायचे असेल तर तुम्हाला मुले असणे आवश्यक आहे,” असं मत जॉनने व्यक्त केलंय.
जॉन-प्रियाचे लग्न कधी झाले?
जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचाल यांनी २०१३ मध्ये अमेरिकेत एका छोट्या खाजगी समारंभात लग्न केले. त्यांनी कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित केला नाही आणि तो अगदी साधेपणाने पार पाडला. नंतर जॉनने एका छोट्या ऑनलाइन पोस्टद्वारे त्यांच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला.
जॉन अब्राहमच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट “द डिप्लोमॅट” होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली आणि बॉक्स ऑफिसवरही तो चांगला चालला. अभिनेत्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत, ज्यात तो लवकरच दिसणार आहे.