अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हिंदी चित्रपटांच्या सद्यस्थितीवर केलं भाष्य; म्हणाले, "मला कायम चिंता..." | bollywood actor pankaj tripathi says he is worried about hindi films box office performance | Loksatta

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हिंदी चित्रपटांच्या सद्यस्थितीवर केलं भाष्य; म्हणाले, “मला कायम चिंता…”

बॉलिवूडच्या सद्यस्थितीवर पंकज त्रिपाठी यांनी मांडलं त्यांचं मत.

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हिंदी चित्रपटांच्या सद्यस्थितीवर केलं भाष्य; म्हणाले, “मला कायम चिंता…”
पंकज त्रिपाठी | Pankaj Tripathi

‘मिर्झापुर’सारख्या वेबसीरिज आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटातून पुढे आलेले पंकज त्रिपाठी हे सध्या बॉलिवूडमधलं मोठं आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहे. २ दशकांहून अधिक काळ पंकज मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत आणि प्रेक्षकांनी त्यांना आणि त्यांच्या कमाला चांगलीच पसंती दर्शवली आहे. सध्या एकूणच मनोरंजनसृष्टी बद्दल निर्माण झालेली उदासीनता आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर न चालणे याबद्दल पंकज यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे चित्रपट आणि मूळ प्रवाहातले व्यवसायिक चित्रपट याविषयी कनेक्ट एफएम कॅनडा या माध्यामशी बोलताना पंकज म्हणाले, “या परिस्थितिमागचं ठोस असं कारण सांगता येणं कठीण आहे. माझ्याच १५ वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर माझ्याही आवडीमध्ये फरक पडला आहे. मी मल्याळम तसेच बंगाली चित्रपट पाहतो, पण मुख्य प्रवाहातले व्यावसायिक चित्रपट अगदी मोजकेच बघतो. कोविड काळानंतर ओटीटीमुळे प्रेक्षकांची आवड बऱ्यापैकी बदलली आहे.”

आणखी वाचा : ‘विक्रम वेधा’च्या कलाकारांनी लावली कपिल शर्मा शोमध्ये हजेरी; सैफ म्हणाला “मी चांगला नागरिक…”

दाक्षिणात्य चित्रपट आणि त्यांच्या कमाईबद्दल बोलताना पंकज म्हणाले, “लोक साऊथचे चित्रपट चालतात असा गवगवा करत आहेत. पण प्रत्यक्षात मोजून ३ किंवा ४ चित्रपटच सुपरहीट ठरले आहेत. पण हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यापद्धतीने व्यावसायिक गणितं मांडून चित्रपट बनवले जातात त्यांच्या लिखणाबद्दल, कथेबद्दल मला नेहमीच चिंता वाटते.”

याबरोबरच चित्रपटसृष्टीला चांगल्या लेखकांची गरज आहे असंही पंकज यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. नुकतीच पंकज यांची क्रिमिनल जस्टीस ही वेबसीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. पंकज आता ‘ओह माय गॉड २’मध्ये अक्षय कुमारबरोबर झळकणार आहेत. शिवाय लोकप्रिय ‘मिर्झापुर सीझन ३’ चं चित्रीकरणही त्यांनी सुरू केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आज ती नसली तरी…” नवरात्रीच्या शुभेच्छा देताना सोनाली कुलकर्णी भावुक, पोस्ट व्हायरल

संबंधित बातम्या

‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा
Padmavati Row : इतिहासकारांची विशेष समिती पाहणार ‘पद्मावती’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार
डॉ. आंबेडकर स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खर्चास आठवले यांचा आक्षेप  
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू