बॉलिवूडमधील इतर कलाकारांप्रमाणे अभिनेता सोनू सूदही सामाजिक घडामोडींवर आपलं मत व्यक्त करत असतो. पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घडलेल्या घटनेबद्दल सोनू सूदने ट्वीट करत पीडित विद्यार्थिनींबरोबर या कठीण प्रसंगात उभं राहण्यासाठी आवाहन केलं आहे.

सोनू सूदने ट्वीट करत “चंदीगड विद्यापीठात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या बहि‍णींना साथ देण्याची, त्यांच्या बरोबर उभं राहण्याची हीच वेळ आहे. एक जबाबदार समाज म्हणून आपण उदाहरण निर्माण केलं पाहिजे. ही कठीण प्रसंगाची वेळ केवळ पीडित विद्यार्थिनींसाठी नसून आपल्या सगळ्यांसाठी आहे”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> IAS अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांना सोनू सूदचा मदतीचा हात; स्कॉलरशिप आणि ऑनलाइन क्लासेसची सुविधा देणार

हेही वाचा >> आमिरचा भाऊ फैजल खानचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला “त्याचा खून…”

नेमकं काय घडलं?

पंजाबमधील मोहाली येथील चंडीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ शूट करून ते व्हायरल केल्याच्या प्रकार घडला आहे. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी रविवारी जोरदार आंदोलन करत निदर्शने केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणीही विद्यार्थिनींकडून केली जात आहे. याप्रकरणी एका विद्यार्थिनींसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >> आरोपी विद्यार्थिनीने तिचा खासगी व्हिडिओ बॉयफ्रेंडला शेअर केला, इतर मुलींचा नाही; चंदीगढ विद्यापीठाचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अटक केलेल्या विद्यार्थिनीने व्हिडीओ शूट करून ते व्हायरल केल्याचा आरोप आहे. अटक केलेल्या विद्यार्थिनीचा मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जवळपास ५५-६० विद्यार्थिनींचे व्हिडीओ व्हायरल केल्याचं बोललं जात आहे. या प्रकारानंतर आठ विद्यार्थीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यापैकी एका विद्यार्थींनीची प्रकृती चिंताजनक आहे.