अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला आहे. त्याला जाऊन आठवडा झाला आहे, त्याचा चाहते आणि मित्र-परिवार या धकक्यातून सवरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. टीव्ही सोबतच सिनेसृष्टितील अनेक कलाकारांनी सिद्धार्थ शुक्लाला सोशल मीडियावर श्रधांजली अर्पण करत पोस्ट शेअर केली आहे. आता सिद्धार्थचा खास मित्र आणि बॉलिवूडचा अभिनेता विद्युत जमवालने पण श्रधांजली अर्पण करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

विद्युतने काला त्याच्या इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन घेतले. यावेळीस त्याला सिद्धार्थच्या निधनाने त्याला खुप मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले. तसंच त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी चाहत्यांन सोबत शेअर करताना तो भावुक झाला. विद्युतने त्याच्या लाईव्ह सेशनची सुरवात एका शांती श्लोकाने केली. सिद्धार्थ आणि त्याच्या मैत्रीला तब्बल १७ वर्ष झाली असून या १७ वर्षाच्या मैत्रीमधील क्षणांच्या आठवणीना तो उजाळा देताना दिसला. २००४ साली विद्युत आणि सिद्धार्थची मैत्री जिममध्ये झाली. नंतर ते जिम पार्टनर्सचे बेस्ट फ्रेंडस कधी झाले ते कळच नाही असे त्याने या व्हिडीओत सांगितले. १५ जुलैला त्यांची शेवटची भेट झाली असल्याचे त्याने या लाईव्ह सेशन मध्ये सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्युत सिद्धार्थच्या आणि त्याच्या आठवणी शेअर करताना म्हणाला, “सिद्धार्थला अॅक्शन व्हिडीओ पाहायला प्रचंड आवडत असे. जिममध्ये तो अनेकदा असे व्हिडिओ पाहायचा. तसंच त्याच्या करिअरच्या सुरवातीला सिद्धार्थने त्याची खुप मदत केली आहे. तो जे विचार करयचा तेच तो बोलायचा. सिद्धार्थला आई बहीणीने लहानाच मोठं केलं आहे. त्याची आई रिता खुप अमेझिंग आहे नेहमी त्याच्यासाठी राजमा-चावल बनवते असे त्याने त्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितले. तसंच सिद्धार्थचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. लोक त्याला खुप मानायचे, मला कोणी शुक्ला नावाचा व्यक्ति दिसला की मी त्याला मी सिद्धार्थ शुक्लाचा मित्र असल्याचे अभिमानाने सांगतो.” या लाईव्ह सेशनच्या शेवटी विद्युतने ‘फास्ट एंड फ्यूरियस’ या चित्रपटाले गाणं सिद्धार्थ शुक्लाला डेडिकेट केले.