जम्मू काश्मीरमध्ये आठ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराने आता संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सध्याच्या घडीला प्रत्येकाच्याच तोंडी कठुआ #KathuaRape बलात्कार प्रकरणीच्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे. कलाविश्वातूनही बऱ्याच सेलिब्रिटींनी या प्रकरणी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संपूर्ण घटनेमुळे माणूसकी कुठेतरी हरवत चालल्याचा महत्त्वाचा मुद्दा प्रत्येकाच्या वक्तव्यातून आणि ट्विटमधून मांडण्यात आला.

रेणुका शहाणे, सोनम कपूर, रिचा चड्ढा या कालाकारांमागोमाग अभिनेत्री गुल पनाग आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कठुआ बलात्कार प्रकरणी पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली आहे. ‘एका पवित्र स्थळी तिच्यावर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. हो मी हिंदुस्तान आहे आणि आज मलाही लाज वाटतेय’, अशा थेट शब्दांमध्ये गुलने ही पोस्ट केली. तिची ही पोस्ट पाहता कठुआ बलात्कार प्रकरणानंतर आज देशाची मान शरमेनं खाली गेलीये हेच ती सांगत असल्याचं स्पष्ट होत आहे.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फक्त गुल पनागच नव्हे, तर जनसामान्यांनीसुद्धा या प्रकरणी आवाज उठवत आता आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. ‘अशी दुष्कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे किंवा त्यांना जिवंत जाळलं पाहिजे’, अशा तीव्र शब्दांमध्ये रणदीप हुड्डाही व्यक्त झाला.