scorecardresearch

“मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा, म्हणाली “माझ्या गाडीचे ब्रेक फेल करुन…”

तनुश्रीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

“मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा, म्हणाली “माझ्या गाडीचे ब्रेक फेल करुन…”
‘कनेक्ट एफएम कनडा’ला तनुश्री दत्ताने दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. (फोटो : तनुश्री दत्ता/ इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता कायमच चर्चेत असते. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली तनुश्री हॅशटॅग मी टू चळवळीमुळे २०२०मध्ये पुन्हा चर्चेत आली होती. तिने चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केला होता. आता तनुश्रीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

‘कनेक्ट एफएम कनडा’ला तनुश्री दत्ताने दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. तनुश्रीने ती उज्जैनमध्ये असताना घडलेल्या घटनेचाही यावेळी उल्लेख केला. “मी उज्जैनमध्ये असताना माझ्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते. याचदरम्यान माझ्या गाडीला भयंकर अपघात झाला होता. त्यावेळी मला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्राव झाल्याने मला यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागला होता”, असं तनुश्री म्हणाली.

हेही वाचा >> ‘तारक मेहता…’ फेम शैलेश लोढांचं राजू श्रीवास्तव यांच्याशी होतं खास नातं, म्हणाले “त्यांचा नंबर मी…”

तनुश्री पुढे म्हणाली “माझ्या घरी घरकाम करायला एक बाई यायची. तिला कोणीतरी मुद्दाम माझ्या घरी पाठवलं होतं. ती माझ्या घरी काम करायला आल्यापासून मी सारखी आजारी पडायला लागले. ती मला पाण्यातून काहीतरी देत असल्याचा मला संशय होता”. बॉलिवूडमध्ये पुन्हा काम मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं तनुश्रीने सांगितलं होतं. परंतु, कोणीतरी माझे हे प्रयत्न अयशस्वी करत असल्याचं ती म्हणाली.

हेही वाचा >> Koffee With Karan 7 : आलिया-रणबीरला बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचा सल्ला, म्हणाली “लग्नानंतर फक्त सेक्स आणि…”

काही महिन्यांपूर्वी तनुश्रीने तिच्याबरोबर घडणाऱ्या घटनांसाठी नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले होते. “जर माझ्याबरोबर काही अघटित घडलं तर त्यासाठी नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील त्यांचे मित्र जबाबदार असतील”, असं ती म्हणाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.