बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतबरोबरील वादानंतर तिचं नाव पाकिस्तानचा क्रिकेटपटू नसीम शाहसह जोडलं गेलं होतं. उर्वशी आणि नसीमबद्दल चर्चाही रंगू लागल्या होत्या. परंतु त्यांनी इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता पुन्हा उर्वशीचं नाव ऋषभ पंतबरोबर जोडलं जात आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा जुना फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी ग्लॅमरस नाही तर साडीतील साध्या लूकमधील फोटो तिने पोस्ट केला आहे. हा फोटो चित्रीकरणादरम्यानचा असल्याचा अंदाज आहे. या पोस्टला तिने “मौत से पहले भी एक और मौत होती है, देखो जरा अपनी मोहब्बत से दूर होकर।“, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ओंकार भोजनेचं नशीब उजळलं, एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार

उर्वशीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी पोस्टवर ऋषभ पंतचं नाव कमेंट करून उर्वशीची फिरकी घेतली आहे. एका नेटकऱ्याने “RP कमेंट कर”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “RP सांग”,अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्याने थेट ‘ऋषभ’ असं कमेंटमध्ये लिहलं आहे.

हेही वाचा >> विकी-कतरिना पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर; शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल

हेही पाहा >> Photos : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ, कमेंट करत म्हणाले “तू तर हुबेहुब…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे बॉलिवूडमधील बोल्ड आणि ग्लॅमरस उर्वशी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याआधी उर्वशीने ऋषभ पंतला सॉरी म्हणाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. परंतु, ऋषभला नाही तर आपल्या चाहत्यांना सॉरी म्हणाले, असं उर्वशीने स्पष्ट केलं होतं.