बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपट ३० मे २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला ३० मे रोजी १० वर्षं पूर्ण झाल्याने ‘धर्मा मूव्हीज’ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून खास पोस्ट शेअर करीत या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा दिला होता. आता दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाच्या आठवणी सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

हेही वाचा : भर कार्यक्रमात विकी कौशलने कतरिना कैफला घातली होती लग्नाची मागणी; पुरस्कार सोहळ्यातील ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

‘ये जवानी है दीवानी’चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर करीत अयान मुखर्जी कॅप्शनमध्ये लिहितो की, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप जवळचा आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण, ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला त्या दिवसापासून मी एकदाही हा चित्रपट पूर्ण ( सुरुवातीपासून-संपेपर्यंत) पाहिलेला नाही. आता जरा मी समजूतदार झालो आहे त्यामुळे येत्या काही वर्षात एकदातरी हा चित्रपट नक्की बघेन, कारण हा चित्रपट माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. खूप लोक माझ्याकडे येतात आणि सांगतात आम्हाला ‘ब्रह्मास्त्र’विषयी बोलायचे आहे परंतु, हे सगळेजण अचानक ‘ये जवानी है दीवानी’बद्दल बोलू लागतात. ज्यांनी या १० वर्षांमध्ये चित्रपटावर मनापासून प्रेम केले, त्या सगळ्या लोकांचे मी आभार मानतो.”

हेही वाचा : “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…,” पत्नी कियाराचा उल्लेख करीत सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला ‘तो’ फोटो

अयान मुखर्जीप्रमाणे मंगळवारी ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाला दहा वर्षं पूर्ण झाल्याने, ‘धर्मा मूव्हीज’ने सुद्धा रणबीर कपूरने साकारलेल्या ‘बनी’ या पात्राच्या डायलॉगचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यावर या चित्रपटाच्या चाहत्यांनी असंख्य कमेंट करीत “याचा दुसरा भाग लवकरात लवकर बनवा किंवा हाच चित्रपट पुन्हा रिलीज करा” अशी मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अयान मुखर्जी दिग्दर्शित गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय प्रमुख भूमिकेत होते. लवकरच या चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित केला जाणार आहे.