Gauhar Khan Second Baby : लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान ४२ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून बाळाच्या जन्माची माहिती दिली आहे. गौहरला पहिला मुलगा आहे, आता तिला दुसराही मुलगा झाला आहे.

गौहर खान आणि तिचा पती झैद दरबार यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. डिसेंबर २०२० मध्ये लग्न करणाऱ्या या जोडप्याने पुन्हा आई-बाबा झाल्याची घोषणा केली आहे. लग्नानंतर जवळपास वर्षांनी गौहर दुसऱ्यांदा आई झाली आहे. गौहर आणि जैदने त्यांच्या सोशल मीडियावर एक क्यूट फोटो शेअर केला आहे.

जेहानच्या धाकट्या भावाचा जन्म १ सप्टेंबर २०२५ रोजी झाला. सर्वांनी आमच्या बाळाला प्रेम व आशीर्वाद द्यावे असं गौहरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पाहा पोस्ट

४२ वर्षांच्या गौहरने ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी कमेंट्समध्ये तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अदिती गोवित्रीकर, अमित टंडन, दिया मिर्झा, नीती मोहन, सौंदर्या शर्मा यांनी गौहरच्या पोस्टवर कमेंट करून तिचं व झैदचं अभिनंदन केलं आहे.

गौहर खान व झैद दरबार यांनी काही काळ डेट केल्यावर २५ डिसेंबर २०२० रोजी मुंबईत लग्न केलं होतं. करोना काळात या जोडप्याने त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एका खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. गौहर पती झैदपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर त्यांनी १० मे २०२३ रोजी त्यांचा मुलगा जेहानचे स्वागत केले. गौहर व झैद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.