51 year old Karisma Kapoors video: अभिनेत्री करिश्मा कपूरने १९९१ साली प्रेम कैदी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘जिगर’, ‘निश्चय’,’अंदाज’, ‘पापी गुडीया’, ‘बाल ब्रम्हचारी’, ‘गोपी किशन’, ‘जीत’, ‘हिरो नंबर १’, ‘आशिक’, ‘हाँ मैंने भी प्यार किया हैं’, अशा अनेक चित्रपटात काम करत तिने स्वत:ची ओळख निर्माण केली.

सध्या करिश्मा कपूर ही तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ती विविध पोस्ट शेअर करत ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.

आता करिश्मा कपूरचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. ५१ वर्षीय करिश्माने तिच्या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिने गळ्यात नेकलेस आणि कानात झुमके घातले आहेत. तसेच केसात गजरा घातल्याचे दिसत आहे. तिने टिकली लावली असून तिच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसत आहे. तिचा हा लूक सध्या लक्षवेधी ठरत आहे.

नेटकरी म्हणाले…

करिश्मा कपूरच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “तू खूप सुंदर दिसत आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह. बिवी नंबर १ चित्रपटाची आठवण आली. तू खूप सुंदर दिसत आहे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “मी आतापर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर स्त्री”, एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह, खूप सुंदर”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच करिश्मा आणि करीना यांनी द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. याबरोबरच, त्यांना एकमेकांच्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, कोणत्या आवडतात याबद्दलही वक्तव्य केले होते.

करिश्मा आणि करीना दोन्ही बहि‍णींमध्ये खूप प्रेम असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. अनेकदा त्या एकत्र वेळ घालवत असल्याचे दिसते.दरम्यान, एक्स पती संजय कपूरच्या निधनानंतर करिश्मा कपूर मोठ्या चर्चेत होती. संजय कपूरच्या संपत्तीवरुन मोठा वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.