गुलजार, मणीरत्नम आणि ए आर रेहमान या त्रिकूटाने बरेच सुपरहीट चित्रपट दिले आहेत. यावर्षी या तिघांनी केलेल्या ‘दिल से’ या चित्रपटालाही ३० वर्षं पूर्ण होणार आहेत. नुकतंच या तिघांनी ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटासाठीही काम केलं. या चित्रपटात गुलजार यांनी लिहिलेलं ‘रूंआ रूंआ’ हे गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. एकूणच ही तीन मातब्बर मंडळी जेव्हा एखाद्या कलाकृतीसाठी एकत्र येतात तेव्हा ती प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरते.

नुकतंच ‘फिल्म कंपॅनीयन’ या युट्यूब चॅनलच्या एका मुलाखतीमध्ये या तिघांनी हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान गुलजार, मणीरत्नम आणि एआर रेहमान यांनी त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी शेअर केल्या. या आठवणींपैकी गुलजार यांनी रेहमानबद्दलची एक खास आठवण शेअर केली.

आणखी वाचा : ‘किसी का भाई किसी की जान’ फ्लॉप ठरल्यामुळे सलमान खान घेणार ब्रेक? जाणून घ्या नेमकं कारण

अनुपमा चोप्रा यांनी ‘सदमा’ चित्रपटादरम्यान रेहमान आणि गुलजार यांची भेट झाल्याची आठवण करून देताना त्यावेळी गुलजार यांना काय वाटलं याबद्दल विचारलं. तेव्हाची नेमकी आठवण गुलजार आणि रेहमान यांना दोघांना आठवणं कठीण असल्याने त्यांना त्या भेटीबद्दल फारसं काहीच बोलता आलं नाही, पण गुलजार यांनी रेहमानबद्दल एका वेगळ्या गोष्टीचा खुलासा केला.

View this post on Instagram

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलजार म्हणाले, “मला नेमकं ती घटना आठवणं कठीण आहे पण मला एक गोष्ट चांगली आठवते ती म्हणजे जावेद अख्तर यांनी रेहमानबद्दल एक छान गोष्ट मला सांगितलेली. त्यावेळी रेहमानचे केस हे कुरळे होते. तेव्हा जावेद अख्तर म्हणाले की तो लहान मुलगा आहे तो बालक भगवान म्हणजेच भगवान श्री कृष्णासारखा दिसतो.” गुलजार यांनी ही आठवण सांगितल्यावर बाकीच्यांनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.