Faissal Khan Made A Big Statement About Brother Aamir Khan : बॉलीवूड अभिनेता आमिर खान व त्याचा भाऊ फैजल खान हे दोघे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. फैजलने आमिर व कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. यानंतर त्याने आमिर खानच्या खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य केलं होतं. आमिर खानचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा त्याने केला होता.
फैजल खानने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याबद्दल सांगितलं होतं. फैजलनं आमिर खान व रीना दत्त यांच्यातील संबंध बिगडले असताना त्याचे जेसिकाबरोबर विवाहबाह्य संबंध होते, असं म्हटलं होतं. फैजल म्हणालेला, “सगळ्यांना माहीत आहे. त्याचे जेसिकाबरोबर संबंध होते आणि त्याला त्या नात्यातून एक मूलही आहे.”
आमिर खानला विवाहबाह्य संबंधातून मूल?
फैजल पुढे आमिरबद्दल म्हणाला, “तो हे नाकारू शकत नाही. तुम्ही डीएनए(DNA) टेस्टही करू शकता. मी बोलत आहे, त्या सगळ्याबद्दल माझ्याकडे पुरावे आहेत. मी उगाच बोलत नाहीये.”
फैजल खान आमिर खानच्या घटस्फोटाबद्दल पुढे म्हणाला, “आमिर व रीना यांच्या नात्यात कटूता आल्याचे मी पाहिलं आहे. त्यांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर आमिर पुन्हा कामावर रुजू झाला. मीसुद्धा त्या काळी कामसाठी संघर्ष करीत होतो.”
भावाबद्दल फैजल पुढे म्हणाला, “घटस्फोटादरम्यान, आमिरनं स्वत:ची निर्मिती संस्था ‘आमिर खान प्रॉडक्शन’ सुरू केली होती. त्यावेळी रीनासुद्धा त्याला मदत करायची. तो त्याच्या कामात खूप व्यग्र होता. मी त्यावेळी त्यांना खूप जवळून पाहिलं आहे. रीनाबरोबर खूप काही घडत होतं; पण मी काही मदत करू शकलो नाही. तो त्याचा निर्णय आहे. त्याचं आयुष्य आहे.”
फैजल खाननं आमिर खानचं प्रेक्षकांमध्ये वेगळं व्यक्तिमत्त्व असून, खऱ्या आयुष्यात तो वेगळा असल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला, “प्रेक्षकांसमोर तो स्वत:बद्दल चांगलं मत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो; पण तुम्ही स्त्रियांबरोबर असलेल्या त्याच्या रिलेशनशिपवरून तो कसा आहे याचा अंदाज बांधू शकता. तो त्याची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो; पण खऱ्या आयुष्यात तो खूप वेगळा आहे.”