बॉलीवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलीवूडकर आले होते. अभिनेता आमिर खानदेखील कर्जतला पोहोचला. त्याने नितीन यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

मोठी बातमी! नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल

नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कारावेळचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान नितीन देसाईंच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करतो. त्यानंतर तो देसाई कुटुंबाची भेट घेतो. यावेळी नितीन देसाई यांच्या मुली व पत्नीला रडू कोसळतं. आमिर सर्वांना भेटू त्यांना धीर देताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नितीन यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर आमिरने माध्यमांशी संवाद साधला. “मी आणि नितीन एकमेकांना बऱ्याच काळपासून ओळखत होतो. ही खूपच दुःखद व धक्कादायक घटना आहे. मला विश्वासच बसत नाहीये. त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलण्याऐवजी मदतीसाठी विचारणा केली असती तर बरं झालं असतं. नितीन देसाई खूप क्रिएटीव्ह होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी उत्तम काम केलं. त्यांचं त्यांच्या कामावर प्रचंड प्रेम होतं. आम्ही एका प्रतिभाशाली व्यक्तीला गमावलं आहे, ते खूप खास होते,” असं आमिर म्हणाला.