Aamir Khan Talks About Thugs of Hindostan Movie : आमिर खान हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्या्ने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आमिरने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. आमिर त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

आमिर खानने काही दिवसांपूर्वीच त्याची गर्ल फ्रेंड गौरी स्प्रॅटबरोबरच्या नात्याबद्दलची घोषणा केली होती. यापूर्वी तो अभिनेत्री फातिमा सना शेखला डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच आता अभिनेत्याने फातिमाबरोबरच्या नात्याबद्दलच्या अफवांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आमिरने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितले आहे.

आमिर खान यामध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातील तिच्या कास्टिंगबद्दल सांगितले, “जेव्हा आम्ही चित्रपटातील या भूमिकेसाठी अभिनेत्रींची निवड करत होतो. तेव्हा अनेकांनी ही भूमिका साकारण्यास नकार दिला. दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर या सगळ्या अभिनेत्रींनी ही भूमिका साकारण्यास नकार दिला. आम्ही इंडस्ट्रीतील अनेकांना विचारलं; पण कोणीही होकार दिला नाही. कदाचित लिखाणामुळे त्यांनी नाही म्हटलं असावं”.

पुढे आमिर फातिमाबद्दल म्हणाला, “चित्रपटाच्या निर्मात्यांनी फातिमाची ऑडिशन घेतली आणि ती त्या भूमिकेसाठी त्यांना योग्य वाटल्यानं तिची निवड झाली. आणि निर्मात्यांनी मला सांगितलं की, चित्रपटात फातिमा आणि तुझे रोमँटिक सीन असू शकत नाहीत. कारण- ‘दंगल’मध्ये तिनं तुझ्या मुलीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना ते आवडणार नाही”.

आमिर पुढे याबद्दल म्हणाला, “नाही मी तिचा बाबा आहे; नाही मी तिचा बॉयफ्रेंड आहे. आम्ही फक्त चित्रपटासाठी काम करतो”. पुढे आमिर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणाला, “अमिताभ बच्चन व वहिदा रेहमान यांनीसुद्धा प्रियकर, प्रेयसीच्या भूमिका साकारूनसुद्धा आई आणि मुलाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक मूर्ख नाहीत. त्यांना माहीत आहे की, चित्रपटातील कलाकारांचं नातं हे फक्त चित्रपटापुरतंच मर्यादित असतं. ते खऱ्या आयुष्यात एकमेकांचे आई किंवा वडील नसतात. आपण कसं सांगतो यावर सगळं अवलंबून असतं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याने अनेक मुलाखती देत वेगवेगळ्या विषयांवर त्याचे मत मांडले होते. तसेच काही किस्सेही सांगितले होते. आता अभिनेता त्याचे ड्रीम प्रोजेक्ट महाभारतवर काम करणार असल्याचे त्याने एका मुलाखतीमधून सांगितले होते.