Aamir Khan Rejected Genelia Deshmukh Movie Sequel : बॉलीवूडचे काही जुने चित्रपट वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतात. असाच एक चित्रपट म्हणजे जिनिलीया डिसूजा-देशमुख आणि इम्रान खान यांचा ‘जाने तू या जाने ना’. इम्रान खानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘जाने तु या जाने ना’ या चित्रपटाचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. आजही हा चित्रपट पाहणारे असंख्य चाहते आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटाचा दुसरा भागही येणार होता.

‘जाने तु या जाने ना’ या चित्रपटच्या दुसऱ्या भागातून जिनिलीया आणि इम्रान ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार होती. पण अभिनेता आमिर खानमुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येऊ शकला नाही. हा चित्रपट अब्बास टायरवाला यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचा दुसरा भागाबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाच्या सिक्वेलसाठी त्यांनी आमिर खानशी संपर्क साधला होता. पण आमिर खानने चित्रपटाचा सिक्वेल करण्यास नकार दिला.

याबद्दल दिग्दर्शक अब्बास टायरवाला म्हणाले की, “माझ्या इंस्टाग्रामवर रोज ‘जाने तु या जाने ना’ सिक्वेलबद्दल मॅसेज येत असतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी मी चित्रपटाचा सिक्वेलसाठी आमिरकडे गेलो होतो. कधीतरी जय आणि अदिती (इम्रान आणि जिनिलीया यांचे चित्रपटातील नाव) भांडतील. ते दोघे वेगळे होण्याच्या मार्गावर असतील तेव्हा सिक्वेल तिथून सुरू होईल. जय पार्टीमध्ये मेघनाला (चित्रपटातील जयची पूर्वीची प्रेयसी) भेटेल आणि तो दारूच्या नशेत असेल.”

यावरील आमिरच्या प्रतिक्रियेबद्दल अब्बास म्हणाले, “आमिरने मला सांगितले की, या चित्रपटाचा पुन्हा कधीही उल्लेख करू नकोस. जर तू त्याच दिशेने जाणार आहेस तर मला सिक्वेलबद्दल काहीही ऐकायचे नाही.” यावेळी दोघांनीही मान्य केले की, चित्रपटाचा सिक्वेल बनवणे कदाचित यशस्वी होणार नाही.

दरम्यान, ‘जाने तु या जाने ना’ चित्रपटात इम्रान खान, जिनिलीया डिसूझा, प्रतीक पाटील, मंजरी फडणीस आणि अयाज खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी झाला आणि जगभरात ८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. २००८ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपटाची चाहत्यांनी वारंवार सिक्वेलची मागणी केली आहे, परंतू, आता दिग्दर्शक अब्बास यांनी असे घडण्याची शक्यता नाही हे उघड केले आहे.