बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता शर्माचं लग्न अभिनेता आयुष शर्माशी झालं आहे. आयुष व अर्पिता दोघांच्या रंगात बराच फरक आहे. आयुष गोरा आहे, तर अर्पिता सावळ्या रंगाची आहे. यावरून अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं. अर्पिताला वाढलेल्या वजनामुळेही बऱ्याचदा नेटकरी ट्रोल करत असतात. पण आता या ट्रोलर्सचा आयुषने चांगलाच समाचार घेतला आहे. आयुषने अर्पिताच्या रंगाची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपल्याला आपल्या पत्नीचा अभिमान असल्याचं आयुषने म्हटलं आहे.

लग्नाच्या सहा वर्षांनी पतीपासून विभक्त झाली ‘तांडव’ फेम अभिनेत्री; ४ वर्षांनंतर खुलासा करत म्हणाली, “पीडितेसारखं…”

आयुष शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो ‘टेडएक्स प्लॅटफॉर्म’वर बोलताना दिसतोय. तो या व्हिडीओमध्ये सांगतो की, त्याची पत्नी अर्पिता खानला पब्लिक फिगर म्हणून खूप टार्गेट केले जाते. ती ऑनलाइन कोणताही फोटो अपलोड करते तेव्हा लोक तिची खिल्ली उडवतात. अर्पिताला तिच्या रंगामुळे आणि जास्त वजनामुळे टोमणे मारले जातात.

Arijit Singh Love Story: वर्षभरात घटस्फोट, एका मुलाची आई असलेल्या मैत्रिणीशी दुसरं लग्न अन्… जाणून घ्या अरिजीतच्या पत्नीबद्दल

व्हिडीओमध्ये आयुष म्हणाला, “माझ्या पत्नीला तिच्या वाढलेल्या वजनामुळे सतत ट्रोल केले जाते. या लोकांना वाटते की ती एक सेलिब्रिटी आहे, त्यामुळे तिने इतके लठ्ठ नसावे. तिच्या रंगावरूनही तिला बोललं जातं. अर्पिताने सेलिब्रिटीसारखे डिझायनर कपडे घालावेत, असं त्यांना वाटतं. ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर टाकते तेव्हा लोक लगेच तिला तिच्या रंगाची आठवण करून देतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे आयुष म्हणतो, “मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. अर्पिताला स्वतःचा अभिमान आहे. आजच्या जगात आंतरिक सौंदर्याचा आदर केला जात नाही. आपण किती चांगले व्यक्ती आहात हे कोणालाही जाणून घ्यायचे नाही. लोकांना फक्त बाह्य सौंदर्याची काळजी असते आणि त्यांना तेच पहायचे असते. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे कारण तिला तिच्या रंगाशी काहीच अडचण नाही. अर्पिताला ट्रोलिंगचा फरक पडत नाही, ती स्वतःच्या अटीवर तिचं आयुष्य जगते.”