गायक अभिजीत भट्टाचार्यने पुन्हा एकदा बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर टीका केली आहे. २०१५ मध्ये, अभिजीतने सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणानंतर एक ट्वीट केले होते. त्यात बेघर लोकांनी रस्त्यावर झोपू नये, असं लिहून त्याने सलमानवर निशाणा साधला होता. यानंतर गायकाने सलमान खानवर पाकिस्तानी गायकांना सपोर्ट केल्याचा आरोप केला होता. काही दिवसांपूर्वी त्याने शाहरुख खान लोकांना आपल्या फायद्यासाठी वापरत असल्याचं म्हटलं. आता पुन्हा एकदा अभिजीतने सलमानबद्दल केलेल्या विधानाने लक्ष वेधलं आहे.

यूट्यूब चॅनल ‘सेलेब्रानिया स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने सलमानबद्दल केलेल्या विधानानंतर हे स्पष्ट झालंय की दोघांच्या संबंधांमध्ये अद्याप काहीच सुधारणा झालेली नाही. सलमान आपल्या द्वेषालाही पात्र नसल्याचं अभिजीतने म्हटलं आहे. त्याला सलमानबरोबर त्याचं कसं नातं आहे, असं विचारल्यावर अभिजीत म्हणाला, “मला वाटत नाही की तो माझ्या द्वेषालाही पात्र आहे. सलमान फक्त त्याचं नशीब चांगलं असल्याने यशस्वी झाला आहे, तो देव नाही आणि त्याने स्वतःला देव समजू नये.”

“मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून रात्री…”, सलमान खानचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

ज्या पाकिस्तानी कलाकारांना सलमानने पाठिंबा दिला होता त्यांची नावं सांगण्यास अभिजीतने नकार दिला. मात्र अरिजित सिंहच्या जागी राहत फतेह अली खानला घेण्याबाबतचा त्याने उल्लेख केला. “हे लाजिरवाणं आहे. अरिजित हा देशातील सर्वात मोठा गायक असून त्याने सलमानला त्याला परत घेण्यास कधीच विनंती करायला नको होती. त्याऐवजी त्याने सलमानकडे पाठ फिरवायला हवी होती. कधीकधी मला आश्चर्य वाटतं की तो खरंच बंगाली आहे का?” असं अभिजीत म्हणाला.

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान खान आणि अरिजितमध्ये बराच काळ वाद सुरू होता. मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांमधील वाद संपल्याची बातमी समोर आली आहे. सलमानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘टायगर ३’ साठी अरिजीतने एक गाणं गायलं आहे. यावरूनच अभिजीतने टीका केली. तसेच तो म्हणाला की माझ्या अशा स्पष्ट बोलण्यामुळेच मोठे स्टुडिओ आता माझ्याबरोबर काम करू इच्छित नाहीत.