अभिनेत्री जया बच्चन यांना अभिनयाबरोबर त्यांच्या स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचा स्वभाव हा रागीट असल्याचे बऱ्याचदा समोर आले आहे. अनेकदा जया बच्चन या सार्वजनिक ठिकाणी रागावतानाही दिसतात. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्या चाहत्यांना अनेकदा फटकारताना दिसतात. जया बच्चन या इतक्या रागात का असतात? याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र त्या इतक्या का चिडतात याबद्दल त्यांची मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी भाष्य केले होते.

अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी २०१९ कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांनी जया बच्चन यांना राग का येतो? त्या पापाराझीवर का भडकतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी करणने म्हटले होते की जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात त्या पापाराझीवर चिडतात, ओरडतात, ट्रोल करतात असेही बोललं जाते, पण यामागचे नेमकं कारण काय? त्यावर अभिषेकने स्पष्ट भाषेत उत्तर दिले होते.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण

त्यावर श्वेता बच्चन म्हणाली, “मी एकदा माझ्या आईला याबद्दल विचारले होते. त्यावर ती माझ्यावर प्रचंड चिडली आणि म्हणाली, तुम्हा लोकांना तर काहीही येत नाही. फक्त खिल्ली उडवता येते. मी क्लॉस्ट्रोफोबिक आहे. जेव्हा मी माझ्या आजूबाजूला इतकी लोक पाहते, तेव्हा मी त्यांना एकत्र सांभाळू शकत नाही.”

त्यापुढे अभिषेक म्हणाला, “मी, आई, बाबा आणि ऐश्वर्या असे चौघेजण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा आम्ही आमची मानसिक तयारी करुन जातो. कारण यापुढे काय होणार याची आम्हाला कल्पना नसते. पण जेव्हा श्वेता दीदी आमच्याबरोबर असते तेव्हा आम्ही तिला आईबरोबर पाठवतो.”

आणखी वाचा : “जे घडून गेलं ते…” बॉलिवूडमधील नेपोटीजमवर उत्तर देणाऱ्या अभिनेत्री यामी गौतमचं ट्वीट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर करणने जया बच्चन यांना नेमका कशाबद्दल त्रास होतो असे विचारले. “तिला क्लॉस्ट्रोफोबिक आहे, तिला गुदमरल्यासारखे वाटते. पापाराझी तिच्यापासून खूप लांब अंतरावर उभे असतील तरीही तिला तसे होते. कारण याआधी भारतात पापाराझी मोठ्या प्रमाणात नव्हते. पण आता त्यांची इच्छा अशी असते की तुम्ही जर माझा फोटो काढत आहात, तर त्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी”, असेही श्वेता बच्चन म्हणाली.