scorecardresearch

Premium

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन करत होता प्रॉडक्शन बॉयचं काम; किस्सा सांगत म्हणाली…

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन ‘कोणत्या’ चित्रपटासाठी प्रॉडक्शन बॉयचं करत होता काम?

Abhishek bachchan sonali bendre
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन 'कोणत्या' चित्रपटासाठी प्रॉडक्शन बॉयचं करत होता काम? (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बऱ्याच मराठी कलाकारांनी बॉलीवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. सई ताम्हणकर, अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर अशा कित्येक मराठी कलाकारांनी बॉलीवूडमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशाच प्रकारे ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये एक मराठमोळी अभिनेत्री होती. त्या अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी अभिनेता अभिषेक बच्चननं प्रॉडक्शन बॉयचं
केलं होतं.

९० च्या दशकातील ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे होती. नुकताच सोनालीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये तिनं ‘मेजर साब’ चित्रपटाचा किस्सा सांगितला आहे. अभिषेक बच्चननं त्यावेळेस प्रॉडक्शन बॉयचं काम केल्याचं तिनं सांगितलं. ‘द ललनटॉप’ या वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये “तू कोणाची चाहती आहेस?” असं विचारल्यावर सोनाली म्हणाली, “मी अमिताभ बच्चन यांची मोठी चाहती आहे. त्यांच्याबरोबर मी ‘मेजर साब’ हा चित्रपट पहिल्यांदा केला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना हात-पाय थरथरत होते. पण, मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा खूप चांगला अनुभव मिळाला. तसेच अजय देवगणही या चित्रपटात होता. त्याच्याबरोबर पूर्वी अनेक चित्रपट केले असल्यामुळे एक कन्फर्ट झोन होता. त्यावेळी अमिताभ यांचा मुलगा अभिषेक हा आमचा प्रॉडक्शन बॉय होता. कॉफी, पाणी आणून देणे आणि अशी बरीच काही कामं तो करत होता.”

junaid-khan-aamir-khan
‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसह आमिरचा मुलगा जुनैद खान करणार रोमान्स; चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”
Prabhavalkar Rohini Hattangadi
अनंत महादेवन यांच्या चित्रपटाची घोषणा
karan-johar-ibrahim-ali-khan
सैफ अली खानच्या मुलासाठी अनोख्या पद्धतीने करण जोहरने केली चित्रपटाची घोषणा; प्रेक्षकांनाच विचारले ‘हे’ प्रश्न

“माझा नवरा आणि अभिषेक हे बालपणापासून बेस्ट फ्रेंड आहेत. पण अभिषेकबरोबर माझी मैत्री ‘मेजर साब’ चित्रपटाच्या वेळी झाली. त्यानंतर मला समजलं, माझ्या नवऱ्याचा आणि माझा बेस्ट फ्रेंड एकच आहे,” असं सोनालीने सांगितलं.

हेही वाचा – अपयशाची भीती वाटतेय? मराठमोळी उर्मिला निंबाळकर सल्ला देत म्हणाली, “फक्त यशस्वी…”

हेही वाचा – ‘खतरों के खिलाडी १३’ मधून ‘हा’ स्पर्धक बाहेर; टॉप ८ मध्ये कोणी मारली बाजी, जाणून घ्या

दरम्यान, सोनाली सध्या चित्रपटसृष्टीत अधिक सक्रिय नसली तरी वेब सीरिज आणि रिॲलिटी शो ती करत असते. ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’मध्ये सोनाली परीक्षक म्हणून काम करत आहे. शिवाय लवकरच तिची ‘द ब्रोकन न्यूज सीझन २’ ही वेब सीरिज ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhishek bachchan had work as a production boy in sonali bendre major saab movie pps

First published on: 28-06-2023 at 16:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×