प्रसिद्ध अभिनेता आणि समीक्षक कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके अनेकदा त्याच्या ट्वीटमधून चर्चेत अस्तप. त्याने बऱ्याच ट्वीटमधून बॉलिवूड स्टार्सची खिल्ली उडवली आहे. यामुळे तो अनेकवेळा कायद्याच्या कचाट्यातही सापडला आहे. असे असूनही केआरके अशी वादग्रस्त ट्वीट करतच असतो. सध्या त्याने बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानवर निशाणा साधला असून आपल्या ट्वीटमध्ये साराची खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या केआरकेने सारा अली खानबद्दल आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “बघा, वाईट वेळ कोणावरही येऊ शकते, जशी आत्ता सारा अली खानवर आली आहे! आज या बिचारीला कुणीही चित्रपटात घेत नाही त्यामुळे बिचारीने शहनाजच्या शोमध्ये भाग घेतला आणि समीक्षकही झाली. आता ती जाड्या आशिष चंचलानीबरोबर चित्रपटांचे प्रमोशनही करत आहे! बिचारीची कीव करावीशी वाटते.”

आणखी वाचा : ‘द केरळ स्टोरी’च्या प्रदर्शनावर बंदीची मागणी; निर्माते विपुल शाह म्हणाले, “लव्ह जिहाद वगैरे…”

केआरकेचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आहे. यामध्ये त्याने प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानीवरही अत्यंत अभद्र भाषेत टीका केली आहे. केआरकेच्या या ट्वीटवर बरीच लोक टीका करताना दिसत आहेत. याआधीही केआरके अशा बऱ्याच ट्वीटमुळे चर्चेत आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच आलेल्या सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’बद्दलही केआरकेने अशीच ट्वीट करत खूप टिंगल केली होती. हा चित्रपट ७-९ कोटींचा गल्ला करेल असं त्याने म्हंटलं होतं, तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. सारा अली खान सध्या आदित्य रॉय कपूरसह ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट ८ डिसेंबरला चित्रपटगृहात झळकेल.