१,००० कोटी रुपयांच्या ऑनलाइन पाँझी घोटाळ्यासंदर्भात अभिनेता गोविंदाची चौकशी केली जाणार आहे. याबाबत ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलर टेक्नो अलायन्सने (एसटीए-टोकन) अनेक देशांमध्ये बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन पाँझी घोटाळा केला. या कंपनीचं गोविंदाने कथितरित्या प्रमोशन व समर्थन केलं होतं.

“राष्ट्रवादाच्या नावाखाली पैसे कमवणे….”, नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्य घटनांवर…”

ऑनलाइन पाँझी घोटाळ्यात ओडिशा गुन्हे शाखेने गोविंदाचे नाव चौकशीसाठी घेतले आहे. अभिनेत्याने काही प्रमोशनल व्हिडिओंमध्ये कंपनीचे प्रमोशन केले होते. ईओडब्ल्यूचे महानिरीक्षक जे एन पंकज यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला याबाबत माहिती दिली. “जुलैमध्ये गोव्यात एसटीएच्या भव्य समारंभात सहभागी झालेल्या आणि काही व्हिडिओंमध्ये कंपनीची जाहिरात करणाऱ्या फिल्मस्टार गोविंदाची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच एक टीम मुंबईला पाठवू,” असं ते म्हणाले.

“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”

या प्रकरणात गोविंदा संशयित किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल, असंही त्यांनी नमूद केलंय. “जर आम्हाला तपासात आढळलं की त्याची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या जाहिरातीपूरती मर्यादित होती, तर आम्ही त्याला आमच्या खटल्यात साक्षीदार बनवू,” असं त्यांनी सांगितलं.

“त्यांना वाटत असेल की मी खूप…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

दरम्यान, कंपनीने भद्रक, केओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वरमधील १० हजार लोकांकडून तब्बल ३० कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, या घोटाळ्याअंतर्गत कंपनीने बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, झारखंड आणि इतर राज्यांतील गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचे देश आणि ओडिशा प्रमुख गुरतेज सिंग सिद्धू आणि नीरोद दास यांना ७ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. भुवनेश्वरस्थित गुंतवणूक सल्लागार रत्नाकर पलाई यांना १६ ऑगस्ट रोजी सिद्धूशी संबंध असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. कंपनीचे प्रमुख डेव्हिड गेझ या हंगेरियन नागरिकाविरुद्ध लुकआउट नोटिसही जारी करण्यात आले होते.