बॉलीवूड चित्रपटांमधील रोमँटिक सीन चर्चेचा विषय असतात. इंटिमेट सीन व किसिंग सीन कसे शूट केले जातात, याबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल असतं. खरं तर हे सीन शूट करणं खूप अवघड असतं. कारण कलाकारांना प्रत्यक्षात हे सीन परफॉर्म करावे लागतात. हल्ली अशा इंटिमेट दृश्यांसाठी सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर असतात. कलाकारांना कंफर्टेबल करून असे सीन शूट केले जातात.

बरेचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने सीन नीट शूट होत नाही आणि रिटेक घ्यावे लागतात. अशाच एका किसिंग सीनच्या रिटेकची खूप चर्चा झाली होती. कारण या एका सीनसाठी १०-२० नव्हे तर तब्बल ३७ रिटेक घेण्यात आले होते.

२०१४ मध्ये ‘कांची: द अनब्रेकेबल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा किस्सा घडला. या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात कार्तिक एका प्रियकराच्या भूमिकेत होता. सुभाष घई यांनी दिग्दर्शिक केलेल्या या चित्रपटात काही रोमँटिक, इंटिमेट सीन होते. कार्तिक व मिष्टी यांच्यात एक किसिंग सीन होता.

या किसिंग सीनसाठी बरेच रिटेक घ्यावे लागले होते, त्यामुळे कार्तिक आर्यन नाराज झाला होता. त्याने स्वतः याबद्दल माहिती दिली होती. “हा किसिंग सीन माझ्यासाठी डोकेदुखी ठरेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवशी आम्ही प्रेमी युगुलांसारखे वागत होतो. पण एक सीन नीट शूट व्हावा, यासाठी आम्हाला तब्बल ३७ रिटेक घ्यावे लागले होते. शेवटी सुभाषजी आले आणि ‘ठीक आहे’ असं म्हणाले. तेव्हा झालं बाबा एकदाचं, असं आम्हाला वाटलं,” असं कार्तिक म्हणाला होता.

ती जाणूनबुजून सीन नीट करत नव्हती…

या किसिंग सीनसाठी मिष्टीमुळे रिटेक घ्यावे लागले, असं कार्तिकचं मत होतं. “त्यावेळी मिष्टी जाणूनबुजून सीन नीट करत नव्हती, अशी शक्यता आहे. सुभाष घई यांना एक पॅशनेट किसिंग सीन हवा होता आणि मला किस कसे करायचे हे माहित नव्हते. मी त्यांना विचारणार होतो, ‘सर, मला किस कसे करायचे ते दाखवा’,” असं कार्तिक आर्यनने म्हटलं होतं.

‘कांची: द अनब्रेकेबल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात मिष्टीने कांचीचे पात्र केले होते, तर कार्तिक आर्यन बिंदाच्या भूमिकेत होता. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, आदिल हुसेन, मुकेश भट्ट, चंदन रॉय सान्याल, रिषभ सिन्हा आणि महिमा चौधरी या सर्व कलाकारांची मांदियाळी होती. अनेक दिग्गज कलाकार असूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता.