हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून मनोज बाजयेपींना ओळखले जाते. आपल्या दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये मनोज बाजपेयींनी काम केले आहे. चित्रपटांव्यतरिक्त मनोज बाजपेयी आपल्या वक्तव्यानेही चांगलेच चर्चेत असतात. मात्र, आता वेगळ्याच कारणांनी मनोज बायपेयी चर्चेत आले आहेत. मनोज बाजपेयी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता मनोज बाजपेयींनी या चर्चांवर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोज बाजपेयी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. एवढंच नाही तर ते २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचेही सांगण्यात येत होते. आता वाजपेयींनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे. मनोज बाजपेयाींनी ट्वीटरवर पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बाजपेयांनी ट्वीटरवर ते २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या एका बातमीचा स्क्रिशॉर्ट शेअर केला आहे. या फोटोबरोबर त्यांनी “ही गोष्ट कुणी सांगितली की रात्री स्वप्न पडलं का?” असा प्रश्नही विचारला आहे. मनोज बाजपेयींच्या या पोस्टने ते राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मध्यंतरी मनोज बाजपेयींनी आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद व त्यांचा मुलगा बिहारचे उपममुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. तेव्हापासून बाजपेयी राजकारण येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर जून २०२३ मध्ये पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण कधीही राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

हेही वाचा- Video: आयरा खान व नुपूर शिखरे दुसऱ्यांदा करणार लग्न, दोघांसह आमिर खान, रीना दत्ता अन् आझाद पोहोचले उदयपूरला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज बायपेयींच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच त्यांचा ‘किलर सूप’ हा कॉमेडी क्राईम वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजमध्ये त्यांच्याबरोबर कोंकणा सेन शर्माची मुख्य भूमिका आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन आणि सहलेखन अभिषेक चौबे यांनी केले आहे. ही वेबसिरीज ११ जानेवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. तसेच ते ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे.