बॉलीवूड चित्रपटांमध्ये किसिंग सीन असणं सामान्य गोष्ट आहे. बरेच कलाकार ऑनस्क्रीन किसिंग सीन करण्यात कंफर्टेबल नसतात. काही वेळा तर फक्त इंटिमेट सीन्समुळे कलाकार चित्रपट, वेब सीरिज करण्यास नकार देतात. काही कलाकार मात्र चित्रपटाची कथा आवडल्यावर असे सीन करायला तयार होतात. बॉलीवूड अभिनेता प्रतीक गांधी त्याच्या पहिल्या किसिंग सीनदरम्यान कम्फर्टेबल नव्हता.

प्रतीक गांधी बऱ्याच वर्षांपासून सिनेविश्वात सक्रिय आहे. त्याने अभिनेत्री विद्या बालनबरोबर रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘दो और दो प्यार’मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात त्याने विद्याच्या पतीची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने विद्याबरोबर अनेक किसिंग व इंटिमेट सीन दिले होते. एका मुलाखतीत प्रतीकने पहिल्यांदाच ऑनस्क्रीन किस करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

प्रतीकने त्याच्या व विद्याच्या किसिंग सीनबद्दल माहिती दिली. तसेच हे सीन शूट करताना विद्याने त्याला कम्फर्टेबल होण्यास कशी मदत केली, त्याबद्दल खुलासा केला होता. प्रतीक गांधीच्या इतक्या वर्षांच्या करिअरमधील हा पहिलाच किसिंग सीन होता.

विद्याने सगळं व्यवस्थित हाताळलं

विद्या बालनसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना प्रतीक म्हणाला, “मी सीन शूट करण्यापूर्वी विचारलं होते की कोणतीही गोष्ट दाखवण्याचे अनेक पर्याय असतात. तुम्ही मला सांगा आणि मी कदाचित तुम्हाला काही वेगळे पर्याय सुचवू शकेन. पण स्क्रीनवर काय आणि कसं दाखवायचं आहे याबद्दल दिग्दर्शिक खूप स्पष्ट होती. मी यापूर्वी कधीही किसिंग सीन केले नव्हते. मात्र, विद्याने हे सगळं व्यवस्थित हाताळलं. एक दिग्गज कलाकार म्हणून तो सीन चांगला करणं आणि बिघडवणं पूर्णपणे तिच्या हातात होतं.”

विद्या खूप चांगली आहे, असं म्हणत प्रतीकने तिचं कौतुक केलं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती सतत वातावरण हलकं- फुलकं ठेवण्यासाठी काही ना काही करत असायची. यामुळेच आम्ही तो सीन हसत शूट केला, असंही प्रतीकने नमूद केलं.

दरम्यान, ‘दो और दो प्यार’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. यात विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंधिल राममूर्ती हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. यात विद्या व प्रतीक दोघेही पती पत्नी असतात, नात्यात आलेल्या दुराव्यानंतर ते दोघेही अफेअर करतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे प्रसंग घडतात, त्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

प्रतीक गांधीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकतीच त्याची एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘सारे जहाँ से अच्छा’ असं या नेटफ्लिक्सवरील सीरिजचं नाव आहे. ही सीरिज सध्या ट्रेंडिंग आहे.