‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’सारखे चित्रपट देणारे निर्माते दिग्दर्शक प्रवीण तरडे हे त्यांच्या बिनधास्त, बेधडक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. आज ते मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते म्हणून ओळखले जातात. हिंदी सिनेसृष्टीत ही त्यांनी काम केलं नसलं तरी अनेक निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी त्यांची चांगली ओळख आहे. तर आता त्यांनी सलमान खानचा एक मोठा चित्रपट नाकारला असा खुलासा केला आहे.

प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट बॉलीवूडमधील नामवंत मंडळींनाही आवडला. हा चित्रपट पाहून सलमान खानने प्रवीण तरडे यांना भेटायला बोलावलं होतं. प्रवीण तरडे सलमान खानच्या एका चित्रपटाचं दिग्दर्शनही करणार होते. परंतु काही कारणाने त्यांनी तो चित्रपट नाकारला.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’मुळे ‘चौक’ या मराठी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे? किरण गायकवाडची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “सलमान खानने मला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पाहून भेटायला बोलावलं. त्याच्या ‘अंतिम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मी करणार होतो. मात्र त्या चित्रपटामध्ये व्यावसायिकदृष्ट्या काही बदल करायचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आणि त्या बदलांसाठी मी तयार नव्हतो. हिंदीची गणितं वेगळी होती. ‘मुळशी पॅटर्न’ करायचा आणि तो मी दिग्दर्शित करायचा, तर तो आहे तसाच करावा असं माझं मत होतं. चित्रपटाचे हक्क मी नाही तर निर्मात्यांनी त्यांना दिले होते. चित्रपटात केल्या जाणाऱ्या व्यावसायिक बदलांना मी तयार नव्हतो आणि त्याचमुळे मी सलमान खानला माझा नकार कळवला.”

हेही वाचा : खतरनाक! ‘मुळशी पॅटर्न’चा दुसरा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

सलमान खानचा अंतिम हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रवीण तरडे यांनी नकार दिल्यानंतर या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करू शकला नाही.