बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मोजकेच हिट चित्रपट देऊन इंडस्ट्रीतून गायब झाले. यातल्या काहींनी इंडस्ट्रीला कायमचं अलविदा म्हटलं, तर काहींनी मात्र अभिनय सोडून बिझनेस सुरू केला. असाच एक अभिनेता होता, जो बॉलिवूडचा सुपरस्टार होईल, असं म्हटलं जात होतं. पण, नंतर मात्र त्याने इंडस्ट्री कायमची सोडली. या अभिनेत्याचं नाव सुमित सहगल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“फ्रीज की सुटकेस?” स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या फोटोसह साध्वी प्राचीचे ट्वीट पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “तुम्ही स्वतःला…”

सुमित सहगलने १९८७ मध्ये ‘इन्सानियत के दुश्मन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, गोविंदा आणि मिथुन चक्रवर्तीसारखे मोठे कलाकार होते. या चित्रपटात सुमितची भूमिका काही खास नव्हती, पण त्यानंतर त्याला अनेक चित्रपट मिळाले. या चित्रपटाने ८० च्या दशकात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. सुमितचा अभिनय आणि चित्रपटातील त्याचा लूक प्रेक्षकांना आवडला होता. एकेकाळी प्रेक्षकांची मनं जिंकणारा सुमित आता बऱ्याच काळपासून चित्रपटांपासून दूर आहे. अभिनय जगताला कायमचा अलविदा करणारा सुमित बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री तब्बूच्या बहिणीचा नवरा आहे. सुमितने तब्बूची बहीण व अभिनेत्री फराह नाजशी लग्न केलं होतं.

Photos: दिल्लीत पार पडला स्वरा भास्कर-फहाद अहमदचा रिसेप्शन सोहळा; राहुल गांधी, सुप्रिया सुळेंसह अरविंद केजरीवाल यांची हजेरी

आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर केलं काम

‘न्यूज १८ हिंदी’च्या वृत्तानुसार, १९८७ ते १९९५ पर्यंत सुमित सहगलने जवळपास ३० चित्रपटांमध्ये काम केलं. गोविंदा, मिथुन, शत्रुघ्न सिन्हा, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि सुनील शेट्टी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत सेकंड लीड म्हणून तो झळकला. सुमितचा निरागसपणा लोकांना आवडला, पण तो कायम सेकंड लीड राहिला. हिरो म्हणून त्याला कधीच ओळख मिळाली नाही. सुमितने आपल्या करिअरमध्ये ‘इमानदार’, ‘परम धर्म’, ‘लष्कर’, ‘पति पत्नी और तवायफ’ आणि ‘गुनाह’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. याशिवाय त्याने अभिनेत्री रूपा गांगुलीबरोबर ‘बहार आने तक’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यातलं ‘काली तेरी चोटी है’ गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. मात्र, जेव्हा सुमित चित्रपटांमध्ये आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला तेव्हा तो अचानक रुपेरी पडद्यावरून गायब झाला.

दीड दशकांनंतर पुनरागमन

जवळपास दीड दशकं बॉलिवूडपासून दूर राहिल्यानंतर सुमितने २०१० मध्ये निर्माता म्हणून पुनरागमन केलं. खरं तर तेव्हा तो खूप बदलला होता. त्याचा लूक बदलल्याने त्याला ओळखणंही अवघड होतं. नंतर त्याने ‘रॉक’ हा हॉरर चित्रपट बनवला, ज्यात तनुश्री दत्ता आणि उदिता गोस्वामी मुख्य भूमिकेत होत्या. सुमित सहगलची ‘सुमित आर्ट’ नावाची कंपनी आहे. तिथे डबिंगचं कामही केलं जातं. या कंपनीतून तो कोट्यवधी रुपये कमावतो.

सुमितने केले दोन लग्न

फराह नाझ ही सुमितची दुसरी पत्नी आहे. त्याचं पहिलं लग्न शाहीन बानोशी झालं होतं. शाहीन बानो ही तिच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. शाहीन ही सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड होती, असंही म्हटलं जातं. शाहीन-सुमितचं लग्न १९९० मध्ये झालं होतं. त्यांना सायशा सहगल नावाची मुलगीही झाली. पण, लग्नाच्या १३ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. शाहीनशी घटस्फोट घेतल्यानंतर सुमितने तब्बूची बहीण व प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाझशी दुसरं लग्न केलं. सध्या दोघेही एकत्र आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sumeet saigal married salman khan ex shaheen banu and tabu sister farah naaz know where he is hrc
First published on: 17-03-2023 at 10:54 IST