scorecardresearch

Premium

परिणीती चोप्रानंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या कोण आहे होणारी पत्नी

अभिनेता विद्युत जामवाल लंडनमध्ये करणार लग्न?

actor vidyut jamwal
अभिनेता विद्युत जामवाल लंडनमध्ये करणार लग्न?

नुकताच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांचं मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पंजाबी पद्धतीत दोघांचं लग्न झालं. त्यानंतर आता बॉलीवूडमध्ये अभिनेता विद्युत जामवाल याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लंडनमध्ये विदयुतचं लग्न होणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Indian scientists have solved the mystery of X-rays emitted by black holes
भारतीय शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; कृष्णविवराजवळून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरण रहस्याचा केला उलगडा
Indian Army SSC Tech Recruitment 2024
भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी! शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे ३८१ पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करावा अर्ज
Loksatta kutuhal Marvin Lee Minsky is an American mathematician and computer scientist
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते
How was Aryan Khan as a student in University of California
आर्यन खान विद्यार्थी म्हणून कसा होता? USC तील डीन आणि प्राध्यापिकेने केला खुलासा; म्हणाल्या, “त्याच्या वडिलांनी…”

२०२१ पासून विद्युत जामवाल फॅशन डिझायनर नंदिता महतानीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघांचा साखरपुडा देखील झाल्याचं बोललं जात होतं. पण त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. अशातच आता विद्युत लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अभिनेत्याने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा – Sindhutai Maazi Maai: ‘राज रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्री झळकणार सिंधुताईंच्या भूमिकेत; पाहा मालिकेचा नवा प्रोमो

पॉप डायरीजच्या वृत्तानुसार, विदयुत लग्नबंधनात अडकणार असून लंडनमध्ये अभिनेत्याचा लग्नसोहळा पार पडणार आहे. कारण विद्युतची होणारी पत्नी ही लंडनमध्ये राहणारी आहे. पण दुसऱ्याबाजूला विद्युतने गुपचूप लग्न केल्याचं बोललं जात आहे. परंतु आता हे कितपत खरं आहे हे येत्या काळातचं स्पष्ट होईल.

हेही वाचा – केतकी माटेगावकरचं पहिलं लग्न कोणाबरोबर झालंय? जाणून घ्या…

विद्युतची होणारी पत्नी कोण आहे?

विद्युतची होणारी पत्नी ही दुसरी तिसरी कोणी नसून त्याची गर्लफ्रेंड फॅशन डिझायनर नंदिता महतानी आहे. २०२१ मध्ये अभिनेत्याने नंदिताबरोबर साखरपुडा केला होता. दरम्यान विद्युतने नंदिताबरोबर बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघांचा ताजमहालच्या बाहेर असलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor vidyut jamwal will get married son with girlfriend nandita mahtani in london pps

First published on: 05-10-2023 at 13:14 IST

संबंधित बातम्या

×