‘राजा भैय्या’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘मिलेंगे मिलेंगे’ अशा चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री आरती छाब्रियाने आनंदाची बातमी दिली आहे. आरती आई झाली आहे, तिने एका महिन्याआधी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आरती ४१ व्या वर्षी आई झाली आहे. आरतीने ४ मार्च रोजी मुलाला जन्म दिला असून त्याचं नावही सांगितलं आहे. आरतीच्या पतीचं नाव विशारद बीडासी असून तो चार्टर्ड अकाउंटंट आहे.

आरतीने मुलाचं नाव युवान ठेवलं आहे. तिने ती गरोदर असल्याची बातमी का लपवून ठेवली होती, याबद्दल ‘हिंदुस्थान टाइम्स’ शी बोलताना सांगितलं. “मला वाटत होतं की जेव्हा मला बाळाबद्दल सांगावसं वाटेल तेव्हाच मी सांगेन. आता मला सांगावसं वाटतंय. कारण माझ्या बाळाचा जन्म होऊन एक महिना झाला आहे,” असं ती म्हणाली. तसेच सुरुवातीचे काही महिने आपण कपड्यांमुळे प्रेग्नेन्सी लपवली, असं तिने सांगितलं.

सासरी गुजराती पद्धतीने पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाच महिन्यांपूर्वी केलंय दुसरं लग्न

आरती आणि तिच्या पतीने २०१९ मध्ये अरेंज मॅरेज केलं होतं. लग्नानंतर ते दोघे ऑस्ट्रेलियाला गेले आणि करोना आल्यामुळे तिथेच अडकले. “दूर राहणं तणावपूर्ण होतं, त्या परिस्थिती तुम्ही वेगवेगळ्या भावनांमधून जात असता त्यामुळे गर्भधारणा करू शकत नाही. मी नवीन ठिकाण आणि नवीन लोकांशी जुळवून घेण्यासाठी धडपडत होते, माझ्या शरीरातही खूप बदल होत होते,” असं ती म्हणाली. तसेच ४१ व्या वर्षी बाळाला जन्म देणं हे विशीत किंवा तिशीत जन्म देण्याइतकं सोपं नाही, असंही तिने नमूद केलं.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आधी माझा गर्भपात झाला होता, त्यामुळे यावेळी मी गर्भधारणेबद्दल न सांगायचं ठरवलं. मला उपचार घ्यावे लागले, तेव्हा मी गरोदर राहिले. बरेच लोक बोलतात ही अभिनेत्री आहे, हिच्याकडे पैसा आहे, त्यामुळे काही अडचण नाही. पण असं नसतं. हे उपचार आरोग्यावर परिणाम करतात. माझं वजन विचित्र पद्धतीने वाढलं, मला औषधांचे दुष्परिणाम जाणवत होते. औषधं घेऊनही मी गरोदर झाले नाही, शेवटी मी सर्व आशा सोडून दिल्या होत्या. पण नंतर मी गरोदर राहिले,” असं आरती म्हणाली.