बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने स्वतःच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या दोघीही एकमेकांच्या खास मैत्रिणी आहेत. त्या दोघींची अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतंच ऐश्वर्या राय आणि दीपिका पदुकोणचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत दीपिका पदुकोण ही लाल रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. तर ऐश्वर्या रायने गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यात ऐश्वर्या ही दीपिकाला ओढत डान्स करण्यासाठी घेऊन येते. त्यानंतर त्या दोघीही बेभान होऊन डान्स करताना दिसत आहेत. दीपिका आणि ऐश्वर्या या दोघीही एका पंजाबी गाण्यावर थिरकत आहेत.
आणखी वाचा : Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणच्या मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष, अर्थ आहे फारच खास

विशेष म्हणजे हा डान्स करताना दीपिका ही ऐश्वर्या किस करतानाही दिसत आहे. तर ऐश्वर्या ही दीपिकाला मिठी मारत आहे. या व्हिडीओत दीपिका, ऐश्वर्यासह रणवीर सिंह आणि अनिल कपूरही दिसत आहेत.

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी यावर कमेंट करताना दिसत आहेत. “ऐश्वर्याने दीपिकाला डान्स करण्यासाठी ओढून घेतले, मला विश्वासच बसत नाही.” अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “ऐश्वर्या किती कूल आहे”, असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “…म्हणूनच मी सुयश टिळकशी लग्न केले” पत्नीने सांगितले खरं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ ईशा अंबानीच्या लग्नातील आहे, असं बोललं जात आहे. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. तर काही जण हा व्हिडीओ दीपिका-रणवीरच्या लग्नातील असल्याचे बोलत आहेत. मात्र अद्याप याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.