छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिताने हिंदी मालिकांमध्य काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. ती इथवरच थांबली नाही तर तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अंकिता घराघरांत पोहोचली. आज एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. कामाबरोबरच अंकिताचं खासगी आयुष्याही चर्चेत राहिलं आहे. व्यावसायिक विकी जैनबरोबर लग्न करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला.

सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या अंकिताचे काही साडीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच फोटोंवरुन अंकिता गरोदर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तिने इन्स्टाग्रामद्वारे साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पोट लपवताना दिसत आहे.

आणखी वाचा – “कपड्यांवरून कुणाचीही मापं काढू नये” गावी जाऊन हेमांगी कवीने घातली मॅक्सी, फोटो पोस्ट करत म्हणाली, “मंडळातल्या…”

अंकिताचे हे फोटो पाहून ती गरोदर आहे का? असा प्रश्न कमेंट्सच्या माध्यमातून चाहते विचारत आहेत. फोटोंमध्ये तिने पोटावर हात, तसेच पर्स ठेवलेली दिसत आहे. पोटावर हात ठेवत तिने विविध पोझ दिल्या आहेत. मात्र अंकिता खरंच गरोदर आहे का? या चर्चांवर तिने अद्यापही मौन कायम राखलं आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम करायचा करण जोहर, दोघांनीही एकाच शाळेमध्ये शिक्षण घेतलं पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१मध्ये अंकिता व विकीने अगदी थाटामाटात लग्न केलं. या दोघांचा विवाहसोहळा अगदी चर्चेचा विषय ठरला होता. इतकंच नव्हे तर अंकिताने लग्नानंतरचा प्रत्येक पहिला सण अगदी उत्तम पद्धतीने सांजरा केला. अंकिता व सुशांत सिंग राजपूत जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या निधनानंतर अंकिताने दिड वर्षामध्ये विकीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.