भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम चर्चेत असतात. अलीकडेच दोघांनी 'प्युमा' (Puma) ब्रॅंडच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान मुलाखतकाराने या जोडीला भन्नाट प्रश्न विचारले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा तिच्या 'बॅंड बाजा बारात' चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहे. कार्यक्रमादरम्यान दोघांनाही विविध टास्क देण्यात आले होते. यामध्ये अनुष्का शर्माला तिच्या कोणत्याही चित्रपटातील फेमस डायलॉग बोलून, विराट कोहलीच्या तो डायलॉग लक्षात आहे का? हे पाहण्यास सांगितले होते. हेही वाचा : अदा शर्माने बॉलीवूडवर केला भेदभावाचा आरोप, महिलांना सेटवर मिळणाऱ्या वागणुकीवर संतापून म्हणाली, “शूटिंगसाठी आधी हिरॉईनला…” यावर अनुष्काने तिच्या 'बॅंड बाजा बारात' चित्रपटातील- "प्यार व्यापार की जोडी कभी नही बैठती, ना भाई मै तो सिंगल ही बेस्ट हूं," हा डायलॉग म्हणून दाखवला आणि पुढचा डायलॉग विराटला पूर्ण करण्यास सांगितले. हे पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. अनुष्काच्या एवढ्या जुन्या चित्रपटातील डायलॉग विराटच्या लक्षात नसेल असा प्रेक्षकांचा समज होता, परंतु विराटने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. हेही वाचा : शुभमन-साराचा ब्रेकअप? इन्स्टाग्रावर केले अनफॉलो; गिलचा ‘तो’ जुना व्हिडीओ होतोय व्हायरल डायलॉग पूर्ण करीत विराट पुढे म्हणाला, "बिझनेस कर ले मेरे साथ. ब्रेड पकोडे की कसम, कभी धोखा नही दूंगा." हे ऐकल्यावर स्वत: अनुष्का थक्क झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. ती पुढे म्हणाली, "विराट डायलॉग बोलत असताना तो मला प्रपोज करतोय असे मला वाटत होते." दरम्यान, विराट-अनुष्काचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्या चाहत्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया देत विराटच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले आहे.