Athiya Shetty Announces Pregnancy : अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहे. या जोडप्याच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे. अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. अथियाने तिच्या वाढदिवसानंतर तीन दिवसांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.

अथिया शेट्टी व केएल राहुल यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर दोन वर्षांपूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांचे लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडलं होतं. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील व सिनेइंडस्ट्रीतील काही मोजकेच लोक उपस्थित राहिले होते. लग्नाला दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच या जोडप्याने आनंदाची बातमी शेअर केली आहे.

हेही वाचा – फिल्मी करिअर ठरलं फ्लॉप, दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटूशी केलं लग्न; या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

अथिया २०२५ मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ‘आमचा सर्वात सुंदर आशीर्वाद २०२५ मध्ये येणार आहे,’ असं कॅप्शन देत अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

पाहा पोस्ट –

अथियाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. इंडस्ट्रीतील अनेक कलाकार या जोडप्याचे अभिनंदन करत आहे. सोनाक्षी सिन्हा, अथियाचा भाऊ अहान शेट्टी, शिबानी दांडेकर, क्रिष्णा श्रॉफ यांनी कमेंट्स करून अथिया व केएल राहुलला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी ५ नोव्हेंबर रोजी अथिया शेट्टीचा ३२ वा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानंतर तीन दिवसांनी तिने पोस्ट करून पहिल्या बाळाचं स्वागत करणार असल्याची ही आनंदाची बातमी दिली आहे.