बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये हुमा कुरेशीच्या नावाचाही समावेश आहे. सध्या हुमा तिच्या आगामी ‘डबल एक्सएल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच सोनाही सिन्हाबरोबरचा तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटासाठी दोघींनीही आपल्या लूकमध्ये बदल केला होता. चित्रपटामधील भूमिकेसाठी वजन वाढवलं. पण प्रत्यक्षातही हुमाला शरीरयष्टीवरून तसेच वाढत्या वजनावरून बरंच ट्रोल करण्यात आलं. याबाबतच तिने आता खुलासा केला आहे.

आणखी वाचा – Photos : ४३व्या वर्षी उर्वशी ढोलकियाने बिकिनी परिधान करत केलं बोल्ड फोटोशूट, स्ट्रेच मार्क फ्लॉन्ट करत म्हणाली, “शरीरयष्टीवरून आम्हाला…”

हुमा सध्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान हुमाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सोनाक्षीही उपस्थित होती. प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान ‘एबीपी न्यूज’शी संवाद साधत असताना हुमाने आपल्याला आधी शरीरयष्टीवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले असल्याचं ती म्हणाली.

काय म्हणाली हुमा कुरेशी?
“ही खूप आधीची गोष्ट आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान मला विचारण्यात आलं होतं की तू बिकिनी कधी परिधान करणार? तुझं वजन कधी कमी होणार? पण त्यावेळी मला कोणत्या गोष्टीचं अधिक ज्ञान नव्हतं. पण तरीही भर कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटींना असे प्रश्न कोण विचारतं हा विचार माझ्या मनात आला.” असं हुमा यावेळी म्हणाली.

आणखी वाचा – अतिउत्साहीपणा नडला; तोल गेला अन् नदीत पडली कंगना रणौत, स्वतःच फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाढत्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं. इतकंच नव्हे तर चित्रपटांमध्येही काम मिळत नसल्याचं हुमाने यावेळी सांगितलं. हुमाने आधीही आपल्याला बॉडी शेमिंगचा सामाना करावा लागला असल्याचं काही मुलाखतींमध्ये म्हटलं आहे.