अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या या गोष्टीमुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची बातमी चाहत्यांनी शेअर केली होती. तिने ही पोस्ट शेअर करताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण, असा प्रश्न अनेकांनी तिला कमेंट करत विचारला. तर प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर आता पहिल्यांदाच तिने तिच्या बॉयफ्रेण्डबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

गरोदरपणाच्या घोषणेनंतर इलियाना सोशल मीडियावरून तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत आहे. सध्या ती तिचं गरोदरपण चांगलंच एन्जॉय करताना दिसतेय. नुकतीच ती बेबीमूनसाठी मुंबईबाहेर गेली आहे. तिच्याबरोबर तिचा बॉयफ्रेण्डही आहे. तिने गरोदर असल्याची घोषणा केल्यापासून ती कोणाला डेट करत आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तर आता तिने तिच्या बॉयफ्रेण्डबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : लग्न न करताच इलियाना डिक्रूज होणार आई, गरोदरपणाची घोषणा करत म्हणाली…

इलियानाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. यात ती तिच्या बॉयफ्रेण्डबरोबर डिनर डेटवर गेल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये त्या दोघांचे हात दिसत आहेत आणि त्या दोघांच्याही हातामध्ये घातलेल्या अंगठ्या दिसत आहेत. या फोटोमध्ये तिच्या बॉयफ्रेण्डचा चेहरा तिने दाखवलेला नाही. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “त्याला शांतपणे जेवू द्यायचं नाही, ही माझ्या रोमान्सची व्याख्या आहे.”

हेही वाचा : “या बाळाचे वडील कोण?” अविवाहित इलियाना डिक्रुझने ती आई होणार असल्याचं जाहीर करताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलियानाने शेअर केलेला हा फोटो आता चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत तिचे चाहते त्याचा चेहरा दाखवण्याची तिला मागणी करत आहेत. दरम्यान, एप्रिलमध्ये तिने गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. तर या वर्षी ती आई होईल.