काही दिवसांपूर्वीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. त्यांच्याबरोबरच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच करण जोहरला ऑफिसमध्ये भेटायला गेली तेव्हाचा अनुभव तिने शेअर केला आहे.

क्षिती जोगने या चित्रपटामध्ये रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. इतकच नाही तर करण जोहरने देखील तिचं काम त्याला खूप आवडल्याचं जाहीर मुलाखतीत सांगितलं होतं. आता क्षितीने तिच्या आणि करण जोहरच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे.

आणखी वाचा : “काही कलाकार इतके मोठे स्टार्सही नाहीत, पण…”, क्षिती जोगने सांगितला रणवीर सिंहबरोबर काम करण्याचा अनुभव

एका मुलाखतीत ती म्हणाली, “मला पहिल्यांदा या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी फोन आला. मी पाठवलेली ऑडिशन त्यांना खूप आवडली आणि लगेच दोन दिवसांनी करण सरांना मी भेटायला गेले. इतकं हे सगळं पटकन झालं. ते खूप छान आहेत. आमच्या भरपूर गप्पा झाल्या. माझ्या कामाबद्दल आम्ही बोललो. मग मी आधी काय काय काम केलं आहे त्यांनी विचारलं. त्यांनी माझा एक शो पाहिला होता. त्या सुमारास झिम्मा चित्रपटाचा शूटिंग झालं होतं तेव्हा मी त्यांना सांगितलं की हा चित्रपट निर्मित केला आहे. ते ऐकूनही त्यांना आनंद झाला. त्या पहिल्या भेटीचा अनुभव खूप छान होता. मला त्यांना भेटण्याच्या आधी वाटलं होतं की ते खूप बॉलीवुडिश असतील. पण तसं काहीही नाही. ते मला आपल्यातलेच एक वाटले.”

हेही वाचा : “सेटवर रणवीर-आलिया…”, क्षिती जोगने सांगितला करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये काम करण्याचा अनुभव

दरम्यान ‘रॉकी रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटगृहात सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 150हून अधिक कोटींची कमाई केली आहे.