‘मेरी प्यारी बिंदू’ फेम अभिनेत्री व फॅशन इनफ्लुएन्सर मालविका सितलानीने तिचा घटस्फोट झाल्याची माहिती दिली आहे. मालविका पती अखिल आर्यनपासून विभक्त झाली आहे. पतीपासून घटस्फोटानंतर खूप त्रास सहन करावा लागला तसेच मुलीच्या जन्मानंतरही अनेक अडचणी आल्या. आता एकटीच मुलीचा सांभाळ करत आहे, असं मालविकाने सांगितलं.

मालविका सितलानीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. आयुष्यात खूप त्रास सहन करत असतानाच चाहत्यांकडून वाईट वागणूक मिळाली, त्यांच्या ट्रोलिंग व तिरस्काराला सामोरं जावं लागलं, असं तिने सांगितलं. मालविकाने पहिल्यांदाच तिच्या घटस्फोटाच्या कारणाचाही खुलासा केला. गरोदर असतानाच पतीपासून विभक्त झाल्याचा मोठा खुलासा ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मालविकाने केला आहे.

Video: नुपूर शिखरेचं आईसह ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त रील; पत्नी आयरा खानची खास कमेंट, तर सुश्मिता सेनला हसू आवरेना

मालविका घटस्फोटाबाबत म्हणाली, “आमच्या मनात एकमेकांबद्दल खूप कौतुक, प्रेम आणि आदर आहे. पण काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुम्ही वेगळे होता आणि आमच्यासोबत हेच घडलं. अनेकदा बऱ्याच लोकांसोबत असं घडतं. त्यामुळे माझ्या आवडत्या लोकांबद्दल कोणीही आपली मतं मांडू नये. तसेच माझ्या खासगी आयुष्याबद्दलही बोलू नये. माझ्या घरात बंद दाराआड काय होतंय, याबद्दल कोणीही न बोललेलं बरं, कारण आता मला एक मुलगी आहे. या सर्व गोष्टींचा तिच्यावर परिणाम होऊ नये, असं मला वाटतं.”

“माझी आई बाबांच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती,” अभिनेत्री अलायाचा गौप्यस्फोट; म्हणाली, “माझा सावत्र भाऊ…”

सिंगल मदर असण्याबद्दल मालविका म्हणाली, “सिंगल मदर असणं खूप कठीण आहे, जोडीदाराशिवाय गरोदरपणा आणि प्रसूतीनंतर येणारं नैराश्य, होणारे बदल या गोष्टी हाताळणं देखील खूप कठीण आहे. गर्भधारणेत होणारा त्रास, रक्तस्त्राव अन् त्याचबरोबर तुटलेलं हृदय या गोष्टीला एकत्र सामोरं जाताना माझ्या आईने माझी खूप मदत केली.”

ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

मालविका सितलानी व अखिल आर्यन यांनी तब्बल ११ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर तीन वर्षांनी २०२३ मध्ये दोघेही विभक्त झाले. मालविकाने गरोदर असतानाच पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तिने मुलीला जन्म दिला. आता ती तिच्या आईच्या मदतीने एकटीच मुलीचा सांभाळ करते आहे.

“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालविकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती २०१७ साली आलेल्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात परिणीती चोप्रा, आयुष्मान खुराना यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात काम केल्यावर मालविकाला फारसे चित्रपट मिळाले नाहीत. बॉलीवूडमध्ये यश न मिळवू शकल्याने मालविकाने व्लॉगिंग सुरू केलं आणि ती फॅशन इनफ्लुएन्सर झाली.