राधिका आपटे ही हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत तसंच वेब सीरिजमध्ये काम करणारी एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तसंच तिने आत्तापर्यंत काही दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह ती ‘कबाली’ या सिनेमात झळकली होती. सध्याच्या घडीला राधिका आपटेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर भाष्य केलं आहे. राजीव मसंद यांनी घेतलेलेल्या मुलाखतीतला हा व्हिडीओ आहे.

राधिका आपटेचा तो व्हिडीओ व्हायरल

राधिका आपटेचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राधिका पत्रकार राजीव मसंद यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. तिने तेलुगू सिनेसृष्टीबद्दल भाष्य केलं आहे. राधिका म्हणते,”तेलुगू सिनेसृष्टीत अर्थात टॉलिवूडमध्ये मला सर्वात जास्त संघर्ष करावा लागला. टॉलिवूड पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान आहे. सिनेमांत महिलेला चांगला दर्जा देत असले तरी प्रत्यक्षात सेटवर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतं. पुरुष कलाकारांकडून महिला कलाकारांना देण्यात येणारी वागणूक वेगळी आहे.”

राधिकाच्या व्हिडीओमुळे तिचं ट्रोलिंग

राधिका आपटेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तुझ्या अशा वागण्यामुळेच टॉलिवूडला तुझी गरज नाही, टॉलिवूडनेच ‘बाहुबली’, ‘पुष्पा’ आणि ‘अॅनिमल’सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. एक वाईट अनुभव संपूर्ण इंडस्ट्रीबद्दल कसा काय असू शकतो? तेलुगू इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न, काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला चुकीचं ठरवू नये, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत आणि राधिकाला ट्रोल केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- “प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय”, मुंबई विमानतळाच्या व्यवस्थेवर राधिका आपटे संतापली, पोस्ट व्हायरल

राधिका आपटे ही वेबसीरिज, हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नावाजलेली अभिनेत्री आहे. सेक्रेड गेम्स या सीरिजमध्ये तिने साकारलेली अंजली माथूर या रॉ एजंटची भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे. तिचा हा जुना व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिला अचानकच नेटकरी ट्रोल करु लागले आहेत. राधिका काही दिवसांपूर्वीच आलेल्या मेरी ख्रिसमस या चित्रपटातही झळकली होती.