Rakul Preet Singh Diet: बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आपल्या अभिनयाबरोबरच फिटनेसमुळे चर्चेत असते. रकुल फिट राहण्यासाठी जिममध्ये व्यायाम करते, तसेच ती तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देते. रकुल तिच्या आरोग्याची खूप काळजी घेते. आता एका मुलाखतीत तिने तिचा डाएट प्लॅन सांगितला आहे. दिवसभर ती काय खाते, तिच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असतो, याची माहिती तिने दिली.

सेलिब्रिटींची जीवनशैली खूपच शिस्तबद्ध असते. अनेक सेलिब्रिटी त्यांचे रोजचे रुटीन चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. हेल्दी आणि संतुलित आहार घेण्याकडे त्यांचा कल असतो. रकुल प्रीतचंही फिट राहण्यासाठी एक रुटीन आहे जे ती फॉलो करते. रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा डाएट कसा असतो, ते सांगितलं. तिच्या दिवसाची सुरुवात कशी होते, ती दुपारच्या जेवणात काय खाते आणि रात्रीच्या जेवणाची वेळ काय असते, याबाबत तिने सांगितलं.

हेही वाचा – विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”

रकुलच्या दिवसाची सुरुवात कशी होते?

रकुल प्रीत म्हणाली, “माझ्या दिवसाची सुरुवात गरम पाण्याने होते. त्यानंतर मी दालचिनीचे पाणी किंवा हळदीचे पाणी पिते. त्यानंतर मी भिजवलेले ५ बदाम, एक भिजवलेले अक्रोड खाते. त्यानंतर तूप कॉफी घेते.”

हेही वाचा – Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

वर्कआउट केव्हा पूर्ण करते, त्यावर प्रोटीन स्मूदी घ्यायची की नाही हे ठरवत असल्याचं रकुलने सांगितलं. “मी पोटभर नाश्ता करते. त्यात अंडी व पोहे किंवा कडधान्यांचे धिरडे याचा समावेश असतो”, असं ती म्हणाली. रकुल दुपारच्या जेवणात काय खाते, याची माहिती तिने दिली. “दुपारच्या जेवणात भात किंवा ज्वारीची भाकरी, मासे किंवा चिकन प्रोटीन घेते. संध्याकाळी ४.३० ते पाच वाजेपर्यंत मी नाश्ता करते. नाश्त्यात चिया सीड्स पुडिंग, फळं आणि दही असतं किंवा मी शूटिंग करत असेल तर पीनट बटर टोस्ट आणि नट्स खाते”, असं रकुल म्हणाली.

हेही वाचा – भारतीय गायकाचे दिलदार पाकिस्तानी चाहते, भर मंचावर दिल्या ‘इतक्या’ कोटींच्या भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रकुलने तिच्या रात्रीच्या जेवणाची वेळ सांगितली. रात्रीचे जेवण ७ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न असतो. रात्रीच्या जेवणात भाजी व दुपारपेक्षा कमी कार्बोदकं असलेल्या पदार्थांचा समावेश करत असल्याचं रकुल म्हणाली.