Rashmika Mandana Fake Video Viral : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलीवूडमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रश्मिका मंदानाचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रश्मिका सध्या तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. तिचा मॉर्फ केलेला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

अवघ्या तीन वर्षांत मोडलं पहिलं लग्न, अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

रश्मिकाचा हा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एडीट केलेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी काळजी व्यक्त करत कायदेशीर कारवाईची मागणीही केली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला आहे.

विश्लेषण: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?

बनावट व्हिडीओ –

हा बनावट व्हिडीओ अभिषेक नावाच्या एका अकाउंवटरून शेअर केला असून तो एडिटेड असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी मुळ व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नाही तर झारा पटेल ही ब्रिटिश-भारतीय तरुणी आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला आहे.

खरा व्हिडीओ –

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अगदी खरा वाटतो. या व्हिडीओमध्ये खऱ्या आणि खोट्यातील फरक करणे खूप कठीण आहे. रश्मिकाच्या बनावट व्हायरल व्हिडीओवर चिंता व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, “कायदेशीर दृष्टिकोनातून हे एक गंभीर प्रकरण आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिग बींशिवाय अभिनेत्रीचे चाहतेही या व्हिडीओवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. कोणीही एखाद्याच्या फोटोचा अशा प्रकारे गैरवापर करणं वाईट आहे. असे व्हिडीओ एडीट करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या जात आहेत.