बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक त्यांच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. आजूबाजूला घडत असणाऱ्या त्यांना पटणाऱ्या किंवा खटकणाऱ्या गोष्टींबद्दल त्या स्पष्टपणे भाष्य करताना दिसतात. आता असिस्टंटवर अवलंबून राहणाऱ्या कलाकारांवर त्यांनी निशाणा साधला आहे.

रत्ना पाठक सध्या त्यांच्या ‘हॅप्पी फॅमिली कंडिशन्स अप्लाय’ या वेब सिरीजमुळे खूप चर्चेत आहेत. या सिरीजमध्ये त्या हेमलता बेन या गुजराती गृहिणीची व्यक्तिरेखा साकारत आहेत. या वेब सिरीजच्या प्रमोशनदरम्यान ‘फिल्म कंपॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कलाकार त्यांच्या असिस्टंट्सवर ज्या प्रकारे अवलंबून असतात त्यावर टीका केली.

आणखी वाचा : “खायला अन्न नाही आणि…” रत्ना पाठक यांची दीपिकाच्या बिकिनी वादाबद्दल संतप्त प्रतिक्रिया

त्या म्हणाल्या, “मी असे अनेक कलाकार पाहिले आहेत जे विमानात कॉफी देखील विचारत नाहीत. त्यांचा असिस्टंट त्यांच्यासाठी कॉफीचा कप घेऊन येतो. तो असिस्टंटच त्यांना त्यावरच झाकण उघडून देतो. हे कलाकार त्यातून एक घोट पितात आणि तो कप पुन्हा एकदा असिस्टंटच्या हातात देतात. कोण आहात तुम्ही? तीन महिन्याचे लहान बाळ? एवढा परावलंबीपणा! जरा विचार करा. आयुष्य यापेक्षा खूप जास्त आहे. मला हे खूप भयानक वाटतं.”

हेही वाचा : Video: ….अन् आशुतोष राणांनी सर्वांसमोर राजकुमार रावच्या कानाखाली मारली, अभिनेत्याने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता त्यांची ही मुलाखत खूप चर्चेत आली आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.