Know about Bollywoods Mystery Girl: बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार जे एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते, त्यांनी बॉलीवूडमध्ये मोठे योगदान दिले. मात्र त्यांना पडता काळ पाहावा लागला. चाहत्यांची संख्या कमी झाली. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या आसपास कमी लोक उरले. अशा कलाकारांमध्ये अभिनेत्री साधना यांचे नाव घेतले जाते.

दिवंगत अभिनेत्री साधना शिवदासानी अशा कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचे आयुष्य हे दु:खद गोष्टीप्रमाणे मानले जाते. त्यांना मिस्टी गर्ल असेही म्हटले जाते. २०१५ मध्ये साधना यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यावेळी साधना यांच्याबाबत अभिनेत्री तबस्सुम स्क्रीनबरोबर संवाद साधताना म्हणाल्या होत्या की मृत्यू त्यांच्यासाठी मोक्ष ठरला.

तबस्सुम असे म्हणण्यामागे काही कारणे होती. साधना यांची प्रकृती तर खालावली होतीच, पण त्याचबरोबर त्या आर्थिक संघर्षदेखील करत होत्या. त्यांना पाठिंबा देणारे कोणीही नव्हते. इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांनीदेखील साधना यांच्या परिस्थितीकडे लक्ष दिले नाही.साधना यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमधील फार कमी लोक त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते.

साधना यांच्याविषयी थोडक्यात…

साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ साली कराचीमधील एका सिंधी कुटुंबात झाला. १९४७ ला जेव्हा फाळणी झाली, तेव्हा त्यांचे कुटुंब भारतात आले. ‘स्टार अँड स्टाईल’ मासिकासाठी त्यांनी एकदा मुलाखत दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, “मुंबईत स्थायिक झाल्यानंतर वडाळा येथील ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळेत असतानाही, मी असे ठरवले होते की माझे शालेय शिक्षण पूर्ण होताच मी अभिनेत्री होईन.”

ठरवल्याप्रमाणे, त्यांनी फिल्मालय स्कूल ऑफ अॅक्टिंगमध्ये प्रवेश घेतला.या ठिकाणी त्यांची भेट दिग्दर्शक आर.के. नय्यर यांच्याशी झाली. पुढे त्यांनी लग्न केले.जेव्हा फिल्मालय स्टुडिओचे मालक शशधर मुखर्जी यांनी त्यांना एका जाहिरातीत पाहिले. तेव्हा त्यांनी साधना यांना अभिनय शाळेत प्रवेश दिला. ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला मोठे यश मिळाले. साधना यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली.

बिमल रॉय यांच्या १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘पारख’ आणि अमरजीत यांच्या १९६१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम दोनो’ या चित्रपटात त्या देव आनंद यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या. कृष्णन-पंजू यांच्या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘मन-मौजी’ मध्ये अभिनेत्री किशोर कुमार यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसल्या. राज खोसला यांच्या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘एक मुसाफिर एक हसीना’मध्ये जॉय मुखर्जी यांच्याबरोबर साधना यांनी स्क्रीन शेअर केली.

१९६० च्या दशकात त्यांची प्रमुख भूमिका असलेलेच १९ चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यापैकी तब्बल ११ चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले. सुरुवातीच्या काळात, ‘फिल्मालय’शी त्यांचा तीन वर्षांच्या करार होता. एका मुलाखतीत त्या म्हणालेल्या, “मला पहिल्या वर्षी महिन्याला ७५० रुपये, दुसऱ्या वर्षी महिन्याला १,५०० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ३,००० रुपये मानधन मिळत होते.”

१९६६ मध्ये साधना यांनी आर. के. नय्यर यांच्या लग्नगाठ बांधली. त्यावेळी त्या केवळ १७ वर्षांच्या होत्या. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांना हायपरथायरॉईडीझम(Hyperthyroidism)चे निदान झाले. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झालाच. त्यांना अभिनयापासून दूर राहावे लागले. यादरम्यान त्यांना उत्तम भूमिका गमवाव्या लागल्या.

उपचारानंतर त्यांनी १९६९ साली प्रदर्शित झालेला ‘इंतकाम’ आणि ‘एक फूल दो माली’ सारख्या चित्रपटांतून पुनरागमन केले. हे चित्रपट हिट ठरले. परंतु १९७० च्या दशकात हळूहळू त्यांना चित्रपटांच्या ऑफर कमी मिळू लागल्या. १९७४ साली प्रदर्शित झालेल्या ‘गीता मेरा नाम’मधून त्यांनी दिग्दर्शनाचा प्रयत्न केला. साधना शेवटचा चित्रपट ‘उल्फत की नई मंजिलें’ १९९४ मध्ये प्रदर्शित झाला.

१९९५ मध्ये आर.के. नय्यर यांचे दम्यामुळे निधन झाले आणि त्या पूर्णपणे एकट्या पडल्या. या जोडप्याला मुले नव्हती. दिनेश राहेजा यांच्याशी बोलताना साधना म्हणालेल्या, “मला आयुष्यात खूप कमी गोष्टींबद्दल खेद आहे- माझं बाळ गमावणं ही त्यापैकी एक आहे.” साधना यांची त्यांच्या शेवटच्या काळात वहीदा रहमान, नंदा, आशा पारेख आणि हेलन यी समकालीन अभिनेत्रींशी जवळीकता वाढली. या अभिनेत्रींनी त्यांना भाविनक पाठिंबा दिला.

साधना त्यांच्या शेवटच्या काळात कायदेशीर लढाईतदेखील अडकल्या. तीन खटले होते, ज्यामध्ये साधना यांचा समावेश होता. सांताक्रूझ येथील त्यांच्या बिल्डिंगचा मालक युसूफ लकडावाला यांनी त्यांच्याविरुद्ध एक खटला दाखल केला होता. त्याच घरमालकाविरुद्ध छळ केल्याचा खटला त्यांनी दाखल केला होता. तिसरा खटला हा मानहानीचा खटला होता.

साधना आर्थिक संघर्ष करत होत्या. त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचा दवाखान्याचा खर्च आणि कायदेशीर खर्च त्या भागवू शकत नव्हत्या. त्यांनी मदतीसाठी याचना केली तरी कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. २५ डिसेंबर २०१५ रोजी साधना यांचा मुंबईतील एका रुग्णालयात अल्प आजाराने त्यांचे निधन झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.