अभिनेत्री सना खानने बॉलिवूडला कायमचाच रामराम केला असल्याची घोषणा केली. तिच्या या निर्णयानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. २०२० मध्ये इस्लाम धर्मासाठी अभिनय क्षेत्रामध्ये काम करणार नसल्याचं सनाने सांगितलं. सना पती अनस सैय्यदबरोबर वैवाहिक जीवनात रमली आहे. अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाद्वारे ती कायमच चाहत्यांशी संवाद साधत असते.

आणखी वाचा – …म्हणून १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खानने किरण रावबरोबर घेतला घटस्फोट; अभिनेत्यानेच केला होता खुलासा

आता सनाने सगळ्यांनाच आनंदाची बातमी दिली आहे. सना व अनसच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ती गरोदर असल्याची माहिती समोर आहे. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘इकरा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सना व अनस यांनी याबाबत माहिती दिली.

सनाने म्हटलं की, “मी खूप उत्सुक आहे. लवकरच माझं बाळ माझ्या हाती असावं असं मला वाटतं”. गेल्या काही दिवसांपासून सना गरोदर असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र तिने याबाबत भाष्य करणं टाळलं होतं. आता स्वतःच तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा – Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सना खान ‘बिग बॉस ९’मध्येही सहभागी झाली होती. या शोमध्ये असताना तिला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सनाने मोठ्या पडद्यावर स्वतःचं नशीब आजमावलं. तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यानच्या काळात तिचं लव्ह लाइफही बरंच चर्चेत होतं. २०२०मध्ये तिने लग्न केल्यानंतर सनाचं आयुष्य बदललं. ग्लॅमरस दुनियेपासून दूर होत तिने स्वतःला धर्मासाठी समर्पित केलं.