Ratan Tata Passed Away: उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजकीय नेतेमंडळी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्यासह सिनेविश्वातूनही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी एक फोटो शेअर करत रतन टाटा यांच्या निधनाबद्दल पोस्ट केली आहे.

सिमी गरेवाल व रतन टाटा एकेकाळी प्रेमात होते. दोघेही लग्न करतील असं म्हटलं जात होतं मात्र काही कारणांनी ते वेगळे झाले. आज रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. सिमी गरेवाल यांनी रतन टाटांची मुलाखत घेतली होती, तेव्हाचा हा फोटो आहे. या फोटोला त्यांनी खूप भावनिक कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा – एकेकाळी रतन टाटा होते ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, पण होऊ शकलं नाही लग्न

सिमी गरेवाल यांची पोस्ट

“सगळे म्हणतायत तुम्ही गेलात..
तुमचं जाणं सहन करणं खूप कठीण आहे..खूपच कठीण आहे.. फेअरवेल माय फ्रेंड”, असं कॅप्शन आणि रतन टाटा यांचा हॅशटॅग देऊन सिमी गरेवाल यांनी पोस्ट केली आहे.

simi garewal post for ratan tata
सिमी गरेवाल यांची रतन टाटांबद्दल केलेली पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

सिमी गरेवाल यांच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत. सिमी गरेवाल यांचा ‘Rendezvous with Simi Garewal’ हा टॉक शो खूप प्रसिद्ध होता. या शोमध्ये उद्योगपती रतन टाटाही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांचे खासगी आयुष्य, लग्न, रिलेशनशिप यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली होती.

हेही वाचा – भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा काळाच्या पडद्याआड, अनेकांना समृद्ध करणाऱ्या खास माणसाची कारकीर्द कशी होती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रतन टाटा यांच्याबद्दल सिमी गरेवाल यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सिमी यांनी रतन टाटांबरोबर असलेल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता. “रतन टाटा आणि माझे फार पूर्वीपासूनचे नाते होते. ते परफेक्ट आहेत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. ते एकदम सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता. ते परदेशात फारच आरामात जीवन जगतात, निवांत असतात; भारतात मात्र ते खूप व्यग्र असतात,” असं सिमी गरेवाल म्हणाल्या होत्या.